vegetable vendors Son Felicitation from Jaiatate
vegetable vendors Son Felicitation from Jaiatate  
उत्तर महाराष्ट्र

भाजीविक्रेत्या महिलेच्या फौजदार मुलाचा जैताणेत सत्कार

प्रा.भगवान जगदाळे

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील कल्पनाबाई केशव माळी (बोरसे) या डोक्यावर भाजीपाला विकणाऱ्या विधवा महिलेच्या फौजदार झालेल्या मुलाचा आज (ता.31) जैताणे (ता.साक्री) ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच संजय खैरनार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

जितेंद्र केशव माळी (बोरसे) असे त्या पितृछत्र हरपलेल्या व कठोर परिश्रमातून पीएसआय झालेल्या तरुणाचे नाव आहे. यापूर्वी जितेंद्रची आई कल्पनाबाई, आजी गोकुळबाई व लहान भाऊ नितीन यांचा तनिष्का व ग्रामपंचायतीतर्फे घरी जाऊन सत्कार करण्यात आला होता.

वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी अर्थात बालपणीच पितृछत्र हरपलेला जितेंद्र माळी हा युवक आयटीआय व बारावी पास झाल्यानंतर सन 2008 साली जिद्दीने व मेहनतीने नाशिक पोलीस दलात भरती झाला. त्यानंतर नोकरी करत असतानाच दरम्यानच्या काळात त्याने मुक्त विद्यापीठातून बी.ए.ची पदवीही मिळवली. सन 2016/17 मध्ये झालेल्या खात्यांतर्गत पीएसआय पदाच्या परीक्षेत तो उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन सध्या नाशिक येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत आहे. त्या पार्श्वभूमीवर जितेंद्रचा जैताणे गावी सुटीवर आलेला असताना ग्रामपंचायतीतर्फे हा सत्कार झाला.

यावेळी सरपंच संजय खैरनार यांच्यासह ग्रामविकास अधिकारी अनिल राठोड, उपसरपंच आबा भलकारे, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर न्याहळदे, नवल खैरनार, सुरेश सोनवणे, प्रकाश पाटील, तुषार खैरनार, पंढरीनाथ सोनवणे, पंकज सोनवणे, शामभाऊ सूर्यवंशी, यादव भदाणे, गोरख सूर्यवंशी, शिक्षक दिलीप पाटकर, संतोष विसपुते, भीमा व्यापारे आदींसह ग्रामपंचायतीचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच खैरनार व पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र माळी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. पीएसआय माळी यांनी ग्रामपंचायतीचे विशेष आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India: टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 6 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT