Somabhai-Modi
Somabhai-Modi 
उत्तर महाराष्ट्र

मतदानाची टक्केवारी वाढवा - सोमाभाई मोदी

सकाळवृत्तसेवा

नाशिक - भावी पिढीच्या उज्वल भवितव्यासाठी मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ज्येष्ठ बंधू सोमाभाई मोदी यांनी आज येथे केले. 

प्रसाद मंगल कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. चंद्रीकाबेन मोदी, महापालिकेचे सभागह नेते दिनकर पाटील, नगरसेविका स्वाती भामरे, अजिंक्‍य साने, धनराज चौधरी, सुजाता करजगीकर, रमेश कडलग आदी या वेळी  उपस्थित होते. भ्रष्टाचार, गरिबी हे देशासमोरील मोठे आव्हान आहे. 

गेल्या साडेचार वर्षांत मोदी सरकारने भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा प्रयत्न केला. गरिबांसाठी अनेक योजना राबविल्या. भावी पिढीचे भवितव्य उज्वल होण्यासाठी या निवडणुकीत प्रत्येकाने मतदानाची टक्‍केवारी वाढविण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री १३ वर्षे होते तेव्हा मी अवघे पाच वेळा त्यांना भेटलो होतो. पंतप्रधान झाल्यानंतरही एकदाच त्यांच्या निवासस्थानी गेलो. २०१७ मध्ये ते गुजरातला विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आले होते. त्या वेळी त्यांना मतदानाची चिठ्ठी देताना भेटलो. त्याव्यतिरिक्त आमची भेट झालेली नाही. आमच्या मातोश्री ९७ वर्षांच्या आहेत. त्या ज्या मुलाकडे आवडेल त्यांच्याकडे राहतात, असेही सोमाभाई मोदी यांनी औपचारिक गप्पांत सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

SCROLL FOR NEXT