Water-Issue
Water-Issue 
उत्तर महाराष्ट्र

गोदातीर कडेकोट बंदोबस्तात

सकाळवृत्तसेवा

नाशिक - गंगापूर व दारणा नदीवरील धरणातून जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यासंदर्भातील वाद सध्या विकोपाला गेला आहे. या धरणांमधून पाणी सोडल्यास शेतकऱ्यांकडून संभाव्य आंदोलनाची शक्‍यता गृहित धरून शहर-जिल्हा पोलिस प्रशासनाकडून चोख पोलिस बंदोबस्ताची तयारी करण्यात आली आहे. तसेच, कायदा व सुव्यवस्था अबाधित व सुरक्षिततेचा उपाय म्हणून राखीव पोलिस दलाच्या जादा तुकड्यांनाही पाचारण करण्यात येणार आहे. 

गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील जायकवाडी धरणामध्ये नाशिक-नगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यासंदर्भात वाद सुरू आहे. एकीकडे न्यायालयीन लढा उभारण्यात आला आहे, तर दुसरीकडे राजकीय नेते व शेतकऱ्यांकडून आंदोलनाची भाषा करीत आहेत. त्यामुळे तणावाची परिस्थिती आहे. नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व दारणा धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आले; तर वाद चिघळण्याची शक्‍यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिस दलाकडून जिल्ह्यातून जाणाऱ्या गोदावरी नदीपात्राची पाहणी केली आहे. त्या संदर्भातील अहवाल जिल्हा प्रशासनाला देण्यात आला. तसेच, संभाव्य आंदोलनाची शक्‍यता पाहता पोलिस बंदोबस्ताचे नियोजनही करण्यात आलेले आहे. वेळप्रसंगी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राखीव पोलिस दलाच्या जादा तुकड्यांना पाचारण केले जाणार आहे. नाशिक शहर हद्दीतील गंगापूर, पंचवटी, आडगाव, नाशिक रोड हद्दीत गोदावरी नदीपात्र येते, तर नाशिक ग्रामीण पोलिस दलाच्या नाशिक तालुका, निफाड तालुक्‍यातून गोदावरी नदी वाहते. त्यामुळे पोलिसांकडून फिरत्या गस्तीपथकासह जागोजागी पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.

शहर हद्दीत गोदावरी नदीपात्राचा परिसर कमी असला, तरी कडेकोट बंदोबस्त असेल. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल. 
- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त, नाशिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT