We should continue the fodder camp after rain fall says Chhagan Bhujbal
We should continue the fodder camp after rain fall says Chhagan Bhujbal 
उत्तर महाराष्ट्र

पाऊस पडल्यानंतरही छावण्या सुरु ठेवाव्यात : छगन भुजबळ

सकाळ वृत्तसेवा

नांदगाव : सध्याच्या दुष्काळातली दाहकता 72 साली पडलेल्या दुष्काळापेक्षा वेगळी असून पाणी नाही म्हणून चारा नाही. नजीकच्या काळात पाऊस सुरु झाला तरी जनावरांना चारा उपलब्ध होईपावेतो जनावरांसाठी सुरु करण्यात आलेल्या छावण्यांचे काम सुरु ठेवावे लागेल. त्यासाठी यंत्रणेने सकारात्मक राहण्याची आवश्यकता माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. आमदार छगन भुजबळ यांनी आज नांदगाव तालुक्यातील चांदोरा येथील अण्णासाहेब जाधव बहुउद्देशीय संस्थेच्या व नांदगाव शहरातील नगराध्यक्ष राजेश कवडे यांच्या छत्रपती जनसेवा मंडळाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या चारा छावण्यांना भेट दिली व दुष्काळात होरपळणाऱ्या पशुधनाच्या अवस्थेची पाहणी केली. या दोघाही संस्थेने जनावरांच्या पिण्याच्या पाण्यापासून चारा आरोग्य याबाबत केलेल्या सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आमदार पंकज भुजबळ, येवल्याचे जेष्ठ नेते अरुणमामा थोरात, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, शहराध्यक्ष बाळकाका कलंत्री, तहसीलदार मनोज देशमुख, गटविकास अधिकारी जगणराव सूर्यवंशी, मनमाडचे माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, नगरसेवक वाल्मिक टिळेकर देवदत्त सोनवणे, कैलास पाटील इत्यादी उपस्थित होते.

चांदोरा येथील छावणीत तेराशे गायी, बैल, वासरे यांच्यासह पाचशेहून अधिक म्हशी संकरित गायी यांचा समावेश बघून त्यासाठी गावकऱ्यांनी वैरणीसाठी केलेली व्यवस्था बघून आमदार छगन भुजबळ यांनी समाधान व्यक्त केले. येथे जनावारांच्या लसीकरण, गोचडी निवारण, एक जनावराला 15 किलो कुट्टी चारा, त्यासोबत सरकी ढेप यांची व्यवस्था चांदोराच्या गावकऱ्यांनी केली आहे. गावकऱ्यांनी भुजबळ यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिवाजी जाधव यांनी केले. यावेळी भुजबळ यांनी गावकऱ्यांशी हितगुज साधले. नांदगावसह सध्या राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बोलतांना छगन भुजबळ यांनी 1972 च्या दुष्काळाच्या आठवणी उजाळा देत तेव्हा उस्मानाबादला तनपुरे महाराजांसोबत आपण दुष्काळात काम केल्याची आठवण सांगितली व मुंबईच्या भाजीपाला बाजारातून कशी मदत केली. या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. आमदार पंकज भुजबळ यांनी चांदोरा येथील चारा छावणी दत्तक घेतली असल्याची माहिती दिली. या चारा छावणीत चांदोरा, न्यायडोंगरी, साकोरा, जमदरी, मुळडोंगरी, तळवाडे, सारताळे, रणखे डा, जळगाव खु, बाभुळवाडी, पोखरी, आदीसह विविध भागातील जनावरे छावणीत दाखल झाली आहेत.

नगराध्यक्ष राजेश कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव शहरात छत्रपती जनसेवा मंडळाच्या वतीने एकविरा देवी मंदिर परिसरातील चारा छावणीला माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी भेट दिली व पाहणी केली. नांदगावच्या या छावणीत लहान मोठे गाय, बैल, वासरे आदी 1400 जनावरे छावणीत दाखल झाली आहेत व याठिकाणी देखील निवाराशेड पिण्याच्या पाण्यासाठी व वैरणीसाठी व्यवस्था बघून भूजबळ यांनी समाधान व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT