chalisgaon
chalisgaon 
उत्तर महाराष्ट्र

चाळीसगाव: विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या 

दीपक कच्छवा

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : मुलीचे लग्न मोठ्या थाटात केले आणि अवघ्या पंधरा दिवस मुलीला वागवून सासरच्यांनी घरी माहेरी पाठवून दिले. सुमारे गेल्या दीड वर्षापासून मेहुणबारे येथे वडिलांकडे राहणाऱ्या रूपाली चव्हाण (वय 25) या विवाहितेने आज वडिलांच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली. 

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) येथील गिरणा विद्या प्रसारक मंडळाच्या हायस्कूलमधील शिपाई साहेबराव चव्हाण यांची मुलगी रूपाली हिचा विवाह गणेशपूर (ता. चाळीसगाव, ह. मु. डोंबिवली) येथे राहणाऱ्या योगेश मोरे याच्याशी 26 मे 2016 ला झाला होता. या विवाहानंतर रूपाली ही पंधरा दिवस सासरी राहिली. त्यानंतर तिला माहेरी मेहुणबारेत पाठवून दिले. तिला घेण्यासाठी सासरचे कोणीही येत नव्हते. रूपाली ही वडिलांकडेच होती. तिचे शिक्षण बी. ए. पर्यत झालेले असल्याने वडिलांनी तिला चाळीसगावला संगणक क्‍लास लावून दिला होता. नेहमीप्रमाणे आज रूपाली चाळीसगाव येथून क्‍लास करून दुपारी बाराच्या सुमारास घरी आली. रूपालीला घटस्फोट देण्याचा अर्ज तिचा पती दिनेश मोरे याने दिलेला होता. त्या संदर्भात सध्या चाळीसगाव न्यायालयात वाद सुरू आहे. 

वडिलांची शुद्धच हरपली 
सायंकाळी पाचला शाळा सुटल्यावर रूपालीचे वडील साहेबराव चव्हाण हे घरी आले असता, घराच्या आतून कड्या लावलेल्या होत्या. मुलगी रूपालीला आवाज दिल्यानंतर तिने प्रतिसाद दिला नाही. साहेबराव चव्हाण यांनी शेजारच्यांना बोलावून घराचा दरवाजा तोडला असता, रूपाली पत्र्याच्या मागच्या खोलीत लोखंडी अँगलाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. हे दृश्‍य पाहताच, साहेबराव चव्हाण हे बेशुद्ध पडले. रूपालीची आई शेतात गेलेली होती. पोलिसांना या घटनेची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप शिरसाठ, ताहेर तडवी, कमलेश राजपूत, सचिन वाघ यांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवला. रूपालीवर उद्या (31 जुलै) सकाळी दहाला अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. या प्रकरणी सध्या तरी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

तीन वेळा पाया पडलो.... 
रूपालीचे वडील साहेबराव चव्हाण यांनी "मुलीला वागवून घ्या' अशी विनवणी करून तिच्या पतीसह सासरच्या लोकांच्या अक्षरशः पाया पडत होते. "तीन वेळा पाया पडलो, तरी त्यांनी ऐकून घेतले नाही' असे सांगताना रुपालीच्या वडिलांना रडू आवरत नव्हते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: झारखंडमध्ये स्कूलबसचा मोठा अपघात

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT