Environment
Environment esakal
उत्तर महाराष्ट्र

जागतिक पर्यावरण दिन : सातपुड्याच्या गतवैभवासाठी झटतोय 70 वर्षीय तरुण

सम्राट महाजन

तळोदा : बोडका झालेल्या सातपुड्याच्या परिसराला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी अतिदुर्गम भागातील ७० वर्षीय तरुण झटतोय. त्यांनी वीस वर्षांत तब्बल पंचवीस हजारांहून अधिक रोपे स्वखर्चाने लावली आहेत. दुर्दम्य इच्छाशक्ती व अथक परिश्रमाच्या जोरावर जवळपास सतरा हजार रोपांचे संवर्धन करीत असलीचा परिसर हिरवागार केला आहे.

सातपुड्याच्या परिसरात पूर्वी विपुल प्रमाणात वनसंपदा होती. मात्र कालांतराने ती नष्ट झाली. सातपुड्याचा परिसर पुन्हा एकदा हिरवागार होण्यासाठी शासकीय यंत्रणा, सामाजिक संघटना काम करीत आहे. असाच एक प्रयत्न बिलाड्या जुगला वळवी (वय ७०, रा. असली, महूपाडा, ता. अक्राणी) यांनी चालविला आहे. नष्ट झालेली वनसंपदा पुन्हा नव्याने प्राप्त करण्याचा चंग बिलाड्या बाबांनी मनाशी बांधला. बिलाड्या बाबांनी रोपांसाठी पाणी नसल्याने असलीच्या दुसऱ्या घाटातून चारी खोदून त्याद्वारे पाणी उपलब्ध केले. तसेच वेळप्रसंगी डोक्यावर पाणी वाहत रोपांना पाणी दिले. त्यांना बाहेरगावी नोकरीला असलेला मुलगा विजय वळवी यांची साथ लाभली असून, विजय वळवी त्यांना दर वर्षी हजारोंच्या संख्येने विविध जातींची रोपे आणून देतात. त्यामुळे आज जवळपास सतरा हजार वृक्ष त्याठिकाणी असून, हा परिसर हिरवागार झाला आहे.

जंगलात राहून वृक्षांचे संवर्धन

असली येथील वन विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या ६० एकर जागेवर वीस वर्षांत दोन हजार आंबे, चार हजार सागवान, पाच हजार बांबू आणि चारोळी, महू, आवळा अशा इतर जातींची १४ हजार अशी एकूण २५ हजारांहून अधिक रोप स्वखर्चाने लावली. बिलाड्या बाबांनी त्याच परिसरात एका झोपडीत राहून लावलेल्या रोपांचे संवर्धन केले. प्रसंगी त्यांना साप व इतर हिंस्त्र प्राण्यांना तोंड द्यावे लागले. मात्र न डगमगता त्यांनी त्यांचे काम सुरूच ठेवले.

पर्यावरणाच्या समतोलासाठी प्रयत्न

ज्या ठिकाणी बिलाड्या बाबांनी रोप लावत त्यांचे संवर्धन केले आहे, ती जमीन वन विभागाची आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी असे प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या बिलाड्या बाबांना मानवी दृष्टिकोनातून व त्यांच्या सद्भावनेचा विचार करून संबंधित विभागाने त्यांच्या कार्यास प्रोत्साहन द्यायला हवे, अशी अपेक्षा त्यांच्या कुटुंबीयांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

''घनदाट जंगल असलेला सातपुड्याच्या दुर्गम भागातील असली हा परिसर कालांतराने अक्षरशः बोडका झाला. त्यामुळे स्वयंप्रेरणेने सदर परिसर हिरवागार करण्याचे ठरविले. त्यासाठी हजारोंच्या संख्येने रोप लावत त्यांचे संवर्धन केले. मात्र यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले. परंतु आता परिसर हिरवागार झाल्याचे समाधान आहे.'' - बिलाड्या वळवी, ग्रामस्थ, असली

''वृक्षतोड एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाली आहे, की एकटा वन विभाग अपुरा पडतोय. मात्र बिलाड्या बाबांमुळे आज त्याठिकाणचा परिसर पूर्णतः हिरवागार झाला आहे. त्यांचे कार्य कौतुकास्पद असून, त्यांच्या कार्यास सलाम.'' - सुभाष पाडवी, ग्रामस्थ, सिसा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: आरवली उड्डाणपूल मे अखेर होणार सुरु

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT