उत्तर महाराष्ट्र

येवला - शाळा दुरुस्तीचे काम न करता खात्यावरुन १ लाख २० हजार गायब

सकाळवृत्तसेवा

येवला - महादेववाडी (सायगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक वस्तीशाळेला शाळा दुरुस्तीकामी मंजूर झालेल्या १ लाख ३० हजार रुपयामधुन १ लाख २० हजार रुपये कुठलीही दुरुस्ती न करता खात्यावरुन काढण्यात आला आहे.या प्रकरणी चौकशी करून कारवाईची तक्रार भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब आहिरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत सन २०१७-१८ मध्ये तालुक्यातील चार वस्ती शाळांना सुमारे ३ लाख ८१ हजार रुपयांचा निधी शाळा दुरुस्तीकामी मंजुर करण्यात आला. यापैकी महादेववाडी वस्ती शाळेला १ लाख ३० हजार रुपयांचा धनादेश ११ सप्टेंबर २०१८ रोजी वितरीत करण्यात आला. सदर निधी हा किचन शेड पत्रे दुरुस्ती, दोन वर्ग खोल्यांच्या छताची घोटई करणे, शाळा खोल्या, स्वच्छतागृह, किचन शेड आदींचे रंगकाम करणे यासाठी देण्यात आला होता. सदर कामाचे शिक्षण विभागाकडून अद्याप अंदाजपत्रक देण्यात आलेले नाही. ज्या कामासाठी हा निधी मंजूर झाला, असे कोणतेही काम न करता या वस्तीशाळेतील शिक्षक देविदास जानराव यांनी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेंद्र आव्हाड यांना अंधारात ठेऊन कोर्या धनादेशावर स्वाक्षर्यां घेऊन मंजुर निधीतील २६ सप्टेंबर रोजी ७० हजार रुपये, तर २९ सप्टेंबर रोजी ५० हजार रुपये काढण्याचा प्रताप केला आहे.

सुमारे ३८ ते ४० पटसंख्या असलेल्या या वस्तीशाळेला सुस्थितीत दोन किचन शेड आहेत. इमारत व शौचालय किरकोळ दुरुस्ती व रंग कामा व्यतिरिक्त फारशा दुरुस्तीची गरज नसल्याचे वास्तव आहे. तरीही शासन स्तरावरुन एवढा निधी मंजुर झालाच कसा? अशी ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. खर्चाला मंजुरी मिळवणे, हेही महत्वाचे असते. दुरुस्तीचे काम करणार्या संबंधित व्यक्तीला धनादेशाद्वारे झालेल्या कामाचे पैसे देणे बंधनकारक असते. हे सर्व नियम पायदळी तुडवत संबंधित शिक्षकाने शालेय व्यवस्थापन समितीच्या खात्यावरुन दुरुस्तीचे काम करण्याआधीच मोठी रक्कम काढल्याने या रकमेचा गैर वापर होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. संबंधित गैरप्रकाराची चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब आहिरे यांनी तक्रार निवेदनाद्वारे केली आहे.

शाळा दुरुस्तीसाठी आलेल्या निधीबाबत मला कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती. शिक्षकाने देखील मला सांगितले नाही. मुलांच्या गणवेशासाठी पैसे द्यायचे आहे म्हणून कोर्या् दोन धनादेशावर माझी स्वाक्षरी घेण्यात आली.
-महेंद्र आव्हाड, अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती

सर्व शिक्षा अभियानांतर्गत विविध प्रकारच्या दुरुस्तीसाठी वस्ती शाळेला आलेला निधी हा लवकरच त्याच कामासाठी खर्च केला जाईल. 
- देविदास जानराव, शिक्षक, महादेववाडी वस्ती शाळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद पण...; दिंडोरीमधूनही 5 अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT