उत्तर महाराष्ट्र

येवला - पोलिसांकडुन गणेश मंडळांना परवाना मिळणार ऑनलाईन

सकाळवृत्तसेवा

येवला - पोलिसांकडुन मिळणार्‍या परवान्यासाठी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात चकरा मारण्याची, बसून राहण्याची वेळ येणार नाही. यंदापासून नाशिक ग्रामिण पोलिसांनी गणेश मंडळांना ऑनलाईन पध्दतीने परवाना देण्याची सुविधा सुरू केली आहे. येथील मंडळानी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

गणेशोत्सवा जवळ आल्याने जागोजागी गणेश मंडळांची आणि कार्यकत्यार्ंची पुर्वतयारी सुरू आहे. वेगवेगळे परवाने घेण्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांना वारंवार चकरा माराव्या लागतात. त्यात बराच वेळही जातो, हे लक्षात घेवुन महाराट्र पोलिसांनी यंदा प्रथमच ऑनलाईन पध्दतीने परवाना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे घरबसल्या आपल्या मोबाईलवरून किंवा घरातील लॅपटॉप-संगणकावरून नोंदणी करून पोलीस परवाना मिळवता येणार आहे अशी माहिती पोलिस अधिक्षक संजय दराडे यांनी दिली आहे.

परवान्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांच्या mhpolice.maharashtra.gov.in/Citizen/MH/Index.aspx या संकेतस्थळावर गेल्यानंतर गणेश मंडळांची नोंदणी हा पर्याय दिसेल, त्यावर किंवा थेट सिटीझन पोर्टलवर जाऊन लॉग-इन आयडी व पासवर्ड तयार करायचा. त्यानंतर मंडळाची माहिती विचारणारा फॉर्म समोर येईल, त्यात मंडळाच्या स्थापनेपासुन विसर्जन मिरवणुकीच्या नियोजनापर्यंतची माहिती भरायची आहे. नगरपालिका, महावितरण यांच्यासह इतर आवश्यक परवाने घेतले असल्यास ते लगेच अपलोड करायचे आहेत, त्यानंतर अर्ज सबमीट करायचा. त्यानुसार तो त्या-त्या भागातील पोलीस स्टेशनमधील अधिकार्‍यांना पहायला मिळेल. ऑनलाईन पध्दतीने मिळालेल्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर पोलीसांकडुन लगेचच कार्यकत्यार्ंच्या ई-मेलवर परवाना पाठवला जाणार आहे.याकामी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी-कर्मचारी मार्गदर्शन करणार आहे.त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये बसुन मोबाईलवरूनही कार्यकर्त्यांना अर्ज भरता येणार आहे.हेही शक्य झाले नाही तर शेवटी पोलीस अर्ज भरण्यास मदत करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT