Akhiesh Yadav
Akhiesh Yadav Ani
Uttar Pradesh Assembly Election 2022

हेलिकॉप्टरचं टेक ऑफ थांबवलं; अखिलेश म्हणतात, हे तर भाजपचं कारस्थान!

निनाद कुलकर्णी

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभेच्या (UP Assembly Election 2022) निवडणुकीपूर्वी सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी भाजपवर (BJP) मोठा आरोप केला आहे. कुठलेही ठोस कारण नसताना आपले हेलिकॉप्टर दिल्लीत थांबल्याचे ट्विट अखिलेस यांनी केले आहे. अखिलेश यादव मुझफ्फरनगरमध्ये निवडणूक रॅलीला (Rally) संबोधित करणार होते. मात्र, त्यांचे हेलिकॉप्टर दिल्लीतच रोखून धरल्याचे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच हे पराभूत भाजपचे षड्यंत्र असून, जनतेला सगळं समजतंय... असे देखील अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. (Akhilesh Yadav Helicopter Stopped In Delhi )

दरम्यान, अखिलेश यादव यांना मुझफ्फरनगरमधील निवडणूक रॅलीला संबोधित करण्यासाठी दिल्लीमार्गे मुझफ्फरनगरला जायचे होते. पण कोणतेही कारण न देता दिल्लीत त्यांचे हेलिकॉप्टर थांबवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच भाजपच्या एका उच्चपदस्थ नेत्याच्या हेलिकॉप्टरला कोणत्याही अडथळ्याशिवाय जाण्याची परवानगी देण्यात आली होती, मात्र माझे हेलिकॉप्टर दिल्लीत रोखून ठेवण्यात आल्याचा आरोप अखिलेश यांनी केला असून, हे पराभूत भाजपचे षड्यंत्र असून, जनतेला सगळं समजतंय... असे सूचक वक्तव्य देखील अखिलेश यादव यांनी केले आहे. एकूणच जसं जसं निवडणूकांच्या तारखा जवळ येऊ लागल्या आहेत तसं तसं युपीसह पाच राज्यांतील राजकीय वातावरण चांगलेच तापण्यास सुरुवात झाली आहे. त्याचेच हे एक उदाहरण म्हणता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काही ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT