SP vs BSP
SP vs BSP esakal
Uttar Pradesh Assembly Election 2022

भाजप-सपा समर्थकांत जोरदार राडा; बसपाचे उमेदवार धावले सपाच्या मदतीला

सकाळ डिजिटल टीम

या घटनेनंतर सपा समर्थक काही तास पोलिस ठाण्यातच ठाण मांडून होते.

हरदोई : उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीचे (Uttar Pradesh Assembly Election) चार टप्पे पूर्ण झाले आहेत. आता पाचव्या टप्प्याचे मतदान होणार आहे. याआधी हरदोई जिल्ह्यातून (Hardoi District) एक मोठी बातमी समोर आलीय. भारतीय जनता पक्ष (BJP) आणि समाजवादी पक्षाच्या (SP) समर्थकांमध्ये हिंसक हाणामारी झालीय. दोन्ही पक्षांच्या समर्थकांमध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल झालाय. निवडणुकीच्या वादातून ही मारामारी झाल्याचं बोललं जातंय. याप्रकरणी एफआयआरही (FIR) दाखल करण्यात आलाय. सपा समर्थकांनी भाजप समर्थकांवर मारहाणीसह अन्य गंभीर आरोप केलेत. दोन्ही पक्षांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना रात्री उशिरा घडलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप आणि सपा समर्थकांमधील हिंसक संघर्षाची ही घटना हरदोई जिल्ह्यातील हरपालपूर पोलीस स्टेशन (Harpalpur Police Station) क्षेत्रातील दिउसीपूर गावातील आहे. या घटनेनंतर सपा समर्थक काही तास पोलिस ठाण्यातच ठाण मांडून होते. त्यांनी भाजप समर्थकांवर मारहाण आणि लुटमार केल्याचा आरोप केलाय. दरम्यान, बसपाचे (BSP) उमेदवार राहुल तिवारी सपा समर्थकाच्या मदतीसाठी पुढे आले. वास्तविक, सपा समर्थकाला भाजप समर्थकानं बेदम मारहाण केल्याचं सांगण्यात येतंय. या मारहाणीचा लाइव्ह व्हिडिओ समोर आलाय. याबाबत एसपी राजेश द्विवेदी म्हणाले, 'एफआयआर नोंदवण्यात आला असून लवकरच पुढील कारवाई केली जाईल.'

हरपालपूर पोलीस स्टेशन हद्दीतील दिउसीपूर गावात राहणाऱ्या मंजेश राजपूतनं सांगितलं की, तो त्याच्या दुकानात बसला होता. यादरम्यान काही लोक तिथं आले आणि त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. दुकानातून मोबाईल चोरल्याचा आरोपही त्यानं केलाय. या मारामारीदरम्यान कोणीतरी मोबाईलवरून व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला, असंही तो म्हणाला. याबाबत माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि जखमी मंजेशला पोलीस ठाण्यात आणलं. दरम्यान, पोलीस ठाण्यासमोर एसपी समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्याचवेळी सपा समर्थकाच्या मदतीला आलेले बसपचे उमेदवार डॉ. राहुल तिवारी हेही पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी कारवाईची मागणी केलीय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT