नरेंद्र मोदी  Sakal
Uttar Pradesh Assembly Election 2022

उन्नाव येथील सभेत PM मोदींचे समाजवादी पक्षावर टीकास्त्र; म्हणाले...

UP Elections 2022: उत्तर प्रदेशातील प्रचारसभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समाजवादी पक्षावर विविध मुद्द्यांवरून टीकास्त्र सोडलं.

सकाळ डिजिटल टीम

Uttar Pradesh Elections 2022: उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूकांमध्ये विजय मिऴवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सर्वच राजकीय पक्षामध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही प्रचारसभांचा धडाका लावला आहे. उत्तर प्रदेशातील उन्नाव (Unnao) येथील प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समाजवादी पक्षावर (Samajvadi Party) जोरदार टीका केली.

"काही दिवसांपूर्वी पंजाबचे (Punjab) मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi)यांनी निवडणुकीत मते मिळवण्यासाठी उत्तर प्रदेशातील गरीब, दलित, मागासलेल्या लोकांवर अत्याचार केले होते. परंतु येथील समाजवादी पक्षाने त्याला एकदाही विरोध केला नाही'', या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उन्नाव येथील प्रचारसभेत समाजवादी पक्षावर टीका केली.

काही दिवसांपूर्वी झालेल्या एका धक्कादायक घटनेनं उन्नाव चर्चेत आलं होतं. तीन अल्पवयीन मुली जंगलात गेल्या होत्या त्यातल्या दोघी मृतावस्थेत तर एक बेशुद्धावस्थेत आढळल्यानं खळबळ उडाली आहे. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, तिन्ही मुलींना एकत्र बांधून घालण्यात आलं होतं. उन्नावमधील बबरुहा गावात बुधवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Cash Withdrawal: आता कॅशसाठी एटीएममध्ये जाण्याची गरज पडणार नाही, स्कॅन करताच रोख रक्कम हातात येईल, पण कसं?

IND vs PAK, Asia Cup: भारतानं हस्तांदोलन टाळलं, पण पाकिस्तानची कारवाई आपल्याच अधिकाऱ्यावर; पदावरूनच केलं बडतर्फ

Latest Marathi News Updates : वंजारा-बंजारा एक आहे, या धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक

Saurabh Bharadwaj Challenge SuryaKumar Yadav : ‘आप’चे नेते सौरभ भारद्वाज यांचं सूर्यकुमार यादवला चॅलेंज अन् टोमणेही मारले!

Bathing Tips for Good Health: स्वच्छतेसोबत आरोग्यही जपा – आंघोळ करताना फॉलो करा या महत्त्वाच्या टिप्स!

SCROLL FOR NEXT