Rakesh Tikait esakal
Uttar Pradesh Assembly Election 2022

मतमोजणीत 'घोळ' होण्याची दाट शक्यता : राकेश टिकैत

सकाळ डिजिटल टीम

हा मतमोजणीचा 'घोळ' थांबवण्यासाठी शेतकऱ्यांनी तयार राहावं.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Assembly Election) शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान (Voting) होत आहे, तर 10 मार्चला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी मोठा दावा करत शेतकऱ्यांना आवाहन केलंय. मतमोजणीत घोळ होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळं शेतकरी बांधवांनी सतर्क रहावं, असं आवाहन त्यांनी केलंय.

राकेश टिकैत पुढे म्हणाले, हा मतमोजणीचा 'घोळ' थांबवण्यासाठी शेतकऱ्यांनी तयार राहावं. यात त्रुटी राहण्याची शक्यता आहे. मतमोजणीत 'घोळ' करुन पराभूत उमेदवारांना विजयाचं प्रमाणपत्र देणार असल्याचंही समजतंय, त्यामुळं जनतेला सतर्क राहणं गरजेचं आहे. शेतकरी नेते टिकैत काल (रविवार) मुझफ्फरनगरमध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांनी मतदान केंद्राजवळ (Voting Center) माध्यमांशी संवाद साधला.

निवडणुकीत विजय कोणाचाही होऊ शकतो, त्यामुळं मतदारसंघात शांतता राखा. कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढू नका, निकाल ऐकून शांततेत घरी परता. यूपीचा 10 मार्चला निकाल लागणार आहे. यूपीसोबतच पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि गोव्याचेही निकाल आहेत, असंही टिकैत म्हणाले. सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानादरम्यान समाजवादी पक्ष (Samajwadi Party) आपल्या ट्विटर हँडलवरून निवडणूक आयोगाकडं (Election Commission) सातत्यानं तक्रारी करत आहे. समाजवादी पक्षाच्या म्हणण्यानुसार, जौनपूर जिल्ह्यामधील 369 मछली विधानसभा मतदारसंघातील बूथ क्रमांक 47 वर ईव्हीएममध्ये (EVM) बिघाड झाल्यामुळं मतदान थांबलं होतं, तर बदलापूर विधानसभा 364 च्या बूथ क्रमांक 116 वर वृद्धांना मतदान करू दिलं जात नसल्याचा आरोप समाजवादी पक्षानं केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

१९ चौकार, ६ षटकार... Vaibhav Sooryavanshi चा भाऊही घालतोय धुमाकूळ! दीडशतक ठोकल्यानंतर भावाची स्पेशल पोस्ट

Mumbai AC Local : खुशखबर! 'मरे'वर आणखी १२ एसी लोकल फेऱ्या; एकूण संख्या १२० वर

SCROLL FOR NEXT