मायावती sakali
Uttar Pradesh Assembly Election 2022

UP Election 2022: काँग्रेसला दलितांचे विस्मरण- मायावती

दलितांचे नेहमीच शोषण झाले आहे. कॉंग्रेस सत्तेत असताना या वर्गाची कधीही आठवण झाली नाही.

सकाळ वृत्तसेवा

प्रयागराज : दलितांचे नेहमीच शोषण झाले आहे. कॉंग्रेस सत्तेत असताना या वर्गाची कधीही आठवण झाली नाही. केवळ निवडणुकीपुरतेच काँग्रेसला दलित समाजाची आठवण येते. काँग्रेसने समाजातील वंचित घटकांसाठी काही केले असते तर आम्हाला पक्ष काढायची गरज भासली नसती. आता महिलांची आठवण येत आहे. सरकार असताना महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर होण्यासाठी कधीही प्रयत्न केले नाहीत, अशी घणाघाती टीका बसपच्या नेत्या मायावती यांनी आज केली.(Uttarpradesh Election Updates)

प्रयागराज येथील केपी कॉलेजच्या मैदानात आयोजित सभेत मायावती यांनी काँग्रेस, भाजप आणि समाजवादी पक्षावर हल्लाबोल केला. धर्मावर राजकारण केले जात असल्याचाही आरोप केला. अखिलेश यांच्यावर टीका करताना त्या म्हणाल्या, की अखिलेश यांच्या राजवटीत गुंड, माफियांनी थैमान घातले होते. जमिनी बेकायदारित्या बळकावल्या जात होत्या. सरकार मूक गिळून बसले होते. माफियांना सरकारकडून आश्रय मिळत होता.

अखिलेश यांच्या काळात जातिवादावर राजकारण खेळले गेले. बहुजन समाज पक्षाने सुरू केलेल्या योजना अखिलेश यांनी बंद केल्या. अनुसूचित जाती आणि जमातींच्या मुलांना परदेशात शिक्षण घेण्याची सुविधा समाजवादी पक्षाने बंद केली. संत रविदास नगरचे नाव बदलून भदोही केल्याचेही त्या म्हणाल्या.

संघाचा अजेंडा राबवला जातोय

उत्तर प्रदेशातील योगी सरकार संघाचा अजेंडा राबवत असल्याचा आरोप मायावती यांनी केला. त्या म्हणाल्या, की उत्तर प्रदेशात बसपचे सरकार आल्यास जुनी पेन्शन योजना लागू केली जाईल, असे मायावती यांनी जाहीर केले. बेरोजगारांना केवळ बेरोजगार भत्ता नाही तर त्यांच्यासाठी रोजीरोटीची देखील व्यवस्था केली जाईल. यासाठी बसपला सत्तेत आणावे लागेल. आमचे सरकार आले तर भाजपच्या जातीवादी आणि हुकूमशाही प्रवृत्तीच्या राजवटीतून उत्तर प्रदेशच्या जनतेची सुटका होईल, असे त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Decision about World Cup: भारत विश्वविजेता झाल्याच्या पाच दिवसांतच ‘ICC’ने विश्वचषकाबाबत घेतला मोठा निर्णय!

India Pakistan Conflict: पाकिस्तान खरंच अणुचाचण्या करतंय का? संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मांडली भारताची भूमिका

MahaBiz Summit : राज्यातील उद्योजकांना मिळणार जागतिक संधींचे व्यासपीठ ‘जीएमबीएफ’ व ‘एमईडीसी’ यांच्या संयुक्त विद्यमाने दुबईत ‘महाबिझ’चे आयोजन

Mahar Vatan Land Scam : मुंढवा येथील जमीन गैरव्यवहारानंतर खळबळ; 'महार वतन जमिनी बळकावणाऱ्यांची सीबीआय चौकशी करा' महार वतन परिषदेची मागणी

Pune Traffic : सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पुलावर रिक्षा-कारचा तिहेरी अपघात! मोठी वाहतूक कोंडी, नागरिक हैराण

SCROLL FOR NEXT