Priyanka Gandhi Meets BJP Supporters Campaign Rally Video
Priyanka Gandhi Meets BJP Supporters Campaign Rally Video e sakal
Uttar Pradesh Assembly Election 2022

भाजप कार्यकर्त्यांनी प्रियंका गांधींसोबत काढले फोटो, व्हिडिओ व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

लखनौ : उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी (UP Election 2022) प्रचार सुरू आहे. यावेळी राजकीय नेते एकमेकांविरोधात टीका करताना दिसतात. एकमेकांचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र, अशातच एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) प्रचार करत असताना भाजप कार्यकर्ते प्रियंका गांधींना भेटले. यावेळी त्यांनी प्रियंका गांधींसोबत फोटो देखील काढले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Priyanka Gandhi Campaign Rally Video)

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी वाटेत भाजप समर्थकांची भेट घेतली. प्रियंका यांनी त्यांच्याशी केवळ हस्तांदोलनच केले नाही तर त्यांना प्रचाराचे साहित्यही वाटले. भाजप समर्थकही प्रियंका गांधींना भेटताना 'लडकी हूं लड़ सकती हूं' चे ब्रेसलेट मागताना दिसले. तसेच भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा जाहीरनामा देखील मागितला. यावेळी प्रियंका गांधी अतिशय नम्रपणे भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिसल्या. राजकारणात असं चित्र फार दुर्मिळ असतं, असं म्हणत सोशल मीडियावर हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे. तसेच काँग्रेसने देखील व्हिडिओ ट्विट करून अतिशय दुर्मिळ चित्र असल्याचं म्हटलंय. भाजप समर्थकांनी प्रियंका गांधींना प्रचाराचे साहित्य मागितले. उत्तर प्रदेशातील चित्र बदलत असून भाजप समर्थक देखील काँग्रेससोबत आहेत, असं ट्विट काँग्रेसने केलं आहे.

यापूर्वी अखिलेश यादव यांच्यासोबतही भेट -

प्रियांका गांधी यांनी अशाच प्रकारे निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या आधी पश्चिम यूपीमध्ये रोड शो दरम्यान अखिलेश यादव आणि जयंत चौधरी यांची भेट घेतली. यावेळी या नेत्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. भेटीचे फोटो व्हायरल झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

Anil Kapoor : "सहजीवनाची 51 वर्षं..."; लग्नाच्या वाढदिवसाला अनिल यांची पत्नीसाठी इमोशनल पोस्ट

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

SCROLL FOR NEXT