file photo
file photo 
विदर्भ

19 लाख लिटर पाण्याची बचत

मंगेश गोमासे

नागपूर, ता. 6 : शहरात असलेल्या जलस्रोतांची पाणीपातळी खालावत चालली आहे. त्यामुळे पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत शहराच्या मध्यभागी असलेल्या केडीके महाविद्यालयाने संपूर्ण महाविद्यालयाच्या बिल्डिंगवर "रूफ टॉप रेनवॉटर हार्वेस्टिंग' प्रकल्प उभारत तीन महिन्यांत 19 लाख लिटर पाण्याची बचत करीत शहरासमोर आदर्श उभा केला आहे. 2008 सालापर्यंत केडीके महाविद्यालयातही पाण्याची कमतरता भासत असल्याने दररोज पाच ते सहा टॅंकर पैसे देऊन मागविण्यात येत होते. दररोज पाच हजार रुपये या प्रमाणे तीन महिन्यांत सहा लाखांवर खर्च होत होता. त्यामुळे पैसा आणि पाण्याची बचत करण्याच्या अनुषंगाने महाविद्यालयाच्या बिल्डिंगवर "रूफ टॉप रेनवॉटर हार्वेस्टिंग' करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी महाविद्यालयातील सिव्हिल आणि मेकॅनिकल शाखेतील प्राध्यापकांची मदत घेत, 16 एकर परिसरात असलेल्या महाविद्यालयांच्या विविध बिल्डिंगवर प्रकल्पास सुरुवात करण्यात आली. या प्रकल्पात तीन महिन्यांत 19 लाख लिटर पाण्याची बचत केली. आता दरवर्षी उन्हाळ्यात लागणाऱ्या पाण्याची गरजही यातूनच भागविण्यात येते. महाविद्यालयात येणारे हजारो विद्यार्थी आणि शिक्षकांसह कर्मचारीवर्ग याच पाण्याचा वापर करतात. विशेष म्हणजे रेनवॉटर हार्वेसिंगच्या या प्रकल्पाने जमिनीच्या पाण्याची पातळीही वाढली आहे. महाविद्यालयाने "रूफ टॉप रेनवॉटर हार्वेस्टिंग' प्रकल्प तयार करताना बिल्डिंगच्या 73 हजार 450 स्क्वेअरफूट छताचा वापर केला. या ठिकाणी पडणारे पावसाचे पाणी पाइपद्वारे परिसरात तयार केलेल्या मोठ्या विहिरीत आणून सोडण्यात आले. दरवर्षी छतावर पडणारे संपूर्ण पाणी वाया जाण्याऐवजी विहिरीत जमा होऊ लागले. त्यामुळे परिसरातील पाण्याचा प्रश्‍नच मिटला असून परिसर हिरवा झाला आहे.
पावसाचे पाणी जमिनीत कसे मुरेल याचा विचार करणे गरजेचे आहे. महाविद्यालयांचीही याविषयी जबाबदारी आहे. या जबाबदारीतूनच "रूफ टॉप रेनवॉटर हार्वेस्टिंग' प्रकल्प राबविण्यात आला. यामुळे आता पाण्याची समस्या सुटली. इतर महाविद्यालयांनीही असे प्रकल्प राबवावे.
-डॉ. अविनाश बदर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

SCROLL FOR NEXT