corona.jpg
corona.jpg 
विदर्भ

बुलडाणेकर कोरोनाला हरविणार; हे आहे कारण!

सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : आरोग्य विभागाचे शर्थीचे प्रयत्न आणि पोलिस प्रशासनाने घेतलेली खबरदारी यामुळे आपण कोरोनाला हरवू शकतो हा विश्वास बुलडाणेकरांना आजच्या निगेटिव आलेल्या दहा रिपोर्ट वरून आला आहे.

बुलडाणा शहरात एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाल्यानंतर चार रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे प्रशासन, आरोग्य विभाग, पोलिस यंत्रणा सर्वच हादरले होते. मात्र गेल्या दोन दिवसात कालचे 3 व आज दहा असे 13 रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आपण कोरोनाला हरवू  शकतो असा विश्वास बुलडाणेकरांना आला आहे. संबंधित व्यक्तीच्या मृत्यूनंतर पोलिस प्रशासनाने खबरदारी घेऊन मृत्यू झालेले व पॉझिटिव्ह आढळलेल्या परिसरात संपूर्ण नाकाबंदी केली आहे. या शिवाय संपूर्ण शहरात बाहेरून येणारे रस्ते बंद केले. 

जिल्ह्यातून शेगाव, खामगाव व बुलडाणा आयसोलेशन (अलगीकरण) कक्षात दाखल संशयित व्यक्तींचे तसेच संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या संशयित 17 व्यक्तींचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तसेच कालपर्यंत 16 संशयितांचे नमुने पाठविण्यात आले आहे. अशाप्रकारे 33 संशयित नागरिकांचे नमुने कोरोना तपासणीसाठी पाठविले. त्यापैकी आज 10 नमुन्यांचे रिपोर्ट प्रात्प झाले असून ते निगेटिव्ह आहेत.  जिल्ह्यात दिल्ली येथील कार्यक्रमातून परतलेल्या 17 व त्यांच्या संपर्कात आलेल्या 13 संशयित व्यक्तींच्या  नमुन्यांचाही यामध्ये समावेश आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी दिली आहे.

दोन्ही यंत्रणांना यश
त्यामुळे एकही बाहेरचा व्यक्ती शहरात येऊ शकला नाही. परिणामी, कोरोनाचा फैलाव रोखण्यात दोन्ही यंत्रणांना यश आल्याचे दोन दिवसातील रिपोर्ट वरून दिसून येते. बुलडाण्यातील झालेला कोरोना संसर्ग हा केवळ एकाच व्यक्तीच्या संपर्कामुळे झाला होता. त्या व्यक्तीच्या संपर्कातील सर्वांना क्वारंटाईन करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. शिवाय पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांवरही उपचार होत आहेत. आरोग्य यंत्रणा व प्रशासकीय स्तरावर पोलिस यंत्रणेने मोठ्या मेहनतीने गर्दीची ठिकाणे सील करून नागरिकांना घरातच थांबण्याच्या बाह्य केले. 

ही दिलासा देणारी बाब
शिवाय बुलडाणेकर नागरिकांनीदेखील घरात थांबून व सोशल डिस्टनसिंगचा नियम पाळून प्रशासनाला एक प्रकारे सहकार्य केले आहे. एका व्यक्तीचा संपर्काने  झालेला हा संसर्ग असल्याने इतर कोणताही दुसरा रुग्ण बुलडाण्यात आढळला नाही. ही दिलासा देणारी बाब ठरली आहे.  घरामध्ये विलगीकरण करण्यात आलेल्या  नागरिकांमध्ये आज  भर पडली नाही. त्यामुळे क्वारंटाईनच्या संख्येत आज वाढ नाही. 3 एप्रिलपर्यंत 76 भारतीय नागरिकांना  त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आले होते. गृह विलीगकरणातील नागरिकांची आज मुक्तता करण्यात आली नाही. 

48 नागरिकांची निरीक्षणातून मुक्तता
अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 76 नागरिक होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात  संस्थात्मक विलगिकरणात आज (ता.4) 14  व्यक्तींना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. संस्थात्मक विलागिकरणातून आज मुक्तता करण्यात आलेली नाही. संस्थात्मक विलगीकरणात आज एकूण 36 नागरिक आहेत. घरीच स्वतंत्र खोलीत 14 दिवस निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या आजपर्यंत 48 नागरिकांची निरीक्षणातून मुक्तता करण्यात आली. तसेच संस्थात्मक विलगीकरनातून 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर आजपर्यंत 61 नागरिकांना निरीक्षणातून घरी सोडण्यात आले. 

तसेच सध्या जिल्ह्यातील 17 नागरिक आयसोलेशन कक्षात दाखल आहेत. अलगीकरणातून आजपर्यंत 18 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली असून यामध्ये बुलडाणा येथील 11 व खामगाव येथील 7 व्यक्तींचा समावेश आहे.आतापर्यंत प्रयोगशाळेत जिल्ह्यातून एकूण 86 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी 63 नमुन्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 5 पॉझिटिव्ह व  58  निगेटिव्ह रिपोर्ट  आले आहेत.  तसेच 23 नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी दिली आहे.

5 संशयितांचे नमुने पाठविले
जिल्ह्यात आज बुलडाणा आयसोलेशन (अलगीकरण) कक्षात 2, शेगाव 2 व खामगाव येथे 1 संशयित म्हणून दाखल करण्यात आले आहे. अशाप्रकारे 5 संशयितांना दाखल करून त्यांचे स्वॅब नमुने  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. आयसोलेशन (अलगीकरण) कक्षात सध्या 17 व्यक्ती दाखल आहेत. त्यामध्ये खामगाव 4, शेगाव 4 व बुलडाणा 9 व्यक्तींचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT