pusad hospital ventilators e sakal
विदर्भ

धक्कादायक! पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयात १० व्हेंटीलेटर्स धूळखात

दिनकर गुल्हाने

पुसद (जि. यवतमाळ) : कोरोनाचा प्रकोप वाढला असताना रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी रेमडेसीव्हिर इंजेक्‍शन, ऑक्‍सिजन व व्हेंटिलेटर्स हे वैद्यकीय शास्त्रातील कोविड काळात परवलीचे शब्द बनले आहेत. केंद्र व राज्य सरकारांत यांच्या पुरवठ्यासाठी युद्धपातळीवरून प्रयत्न सुरू आहेत. त्यातच पुसद उपजिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी जीवनदायी ठरणारे दहा व्हेंटिलेटर्स तब्बल सात महिन्यांपासून धूळखात पडले आहेत.

हा गंभीर प्रकार लक्षात आल्यानंतर नगरसेवक साकीब शाह यांनी पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्यासह जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. या व्हेंटिलेटरच्या वापरासाठी योग्य कारवाई करण्यात यावी व गंभीर रुग्णांचे प्राण व्हेंटिलेटरच्या सहायाने वाचविण्याची विनंतीही त्यांनी प्रशासनाला केली आहे. यासंदर्भात पुसद उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हरिभाऊ फुपाटे यांच्याशी संपर्क साधला असता, मागील वर्षी कोविडच्या काळात पंतप्रधान योजनेतून पुसद उपजिल्हा रुग्णालयाला दहा व्हेंटिलेटर्स पुरविण्यात आले. मात्र, आवश्‍यक भूलतज्ज्ञ, डॉक्‍टर्स व नियमित निरीक्षण ठेवणारी चमू उपलब्ध न झाल्याने व्हेंटीलेटर्स आजपर्यंत उपयोगात आलेले नाहीत. त्यापैकी पाच व्हेंटिलेटर्स यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वरिष्ठांच्या पत्रानुसार पाठविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. कोविड केअर सेंटरमध्ये दाखल प्रत्येक रुग्णाचा आता एक्‍स-रे काढण्यात येणार आहे. यासाठी मोबाईल एक्‍स-रे मशीन मिळाली आहे. त्यासाठी तंत्रज्ञ पुसदला पोहोचला आहे. त्यामुळे सिटी स्कॅन करण्याची आवश्‍यकता राहणार नाही. त्यामुळे रुग्णाचे खासगी सिटीस्कॅनसाठी होणारा खर्च वाचेल, असे डॉ. हरिभाऊ फुफाटे यांनी 'सकाळ'ला सांगितले.

सध्या रुग्णालयात सात एमबीबीएस डॉक्‍टर्स आहेत. त्यापैकी एक उमरखेड येथे प्रतिनियुक्तीवर आहे. शिवाय शालेय आरोग्य तपासणी पथकातील डॉक्‍टर्स उपलब्ध आहेत. सेविका पुरेशा उपलब्ध असताना रुग्णालयात कोविडवरील उपचारयंत्रणा पूर्ण कार्यक्षम पद्धतीने राबविल्यास सर्वसामान्य परिस्थितीतील रुग्णांना खासगी रुग्णालयातील महागड्या उपचारासाठी जाण्याची गरज भासणार नाही. मात्र, या उपजिल्हा रुग्णालयातील 'डीसीसीएच' केंद्र संपूर्ण क्षमतेने चालविण्याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. यासंदर्भात तीनही आमदारांनी लक्ष घालावे, अशी अपेक्षा नगरसेवक साकिब शाह यांनी व्यक्त केली.

ऑक्‍सिजन मूबलक -

पुसद रुग्णालयात कोविडच्या काळात आमदार इंद्रनील नाईक यांच्या निधीतून ऑक्‍सिजनची पुरेपूर व्यवस्था केली आहे. वीस जम्बो व १५ लहान ऑक्‍सिजन सिलेंडर्स रुग्णालयात आहेत. मात्र, सध्यास्थितीत खासगी व शासकीय रुग्णालयात ऑक्‍सिजनचा तुटवडा भासत असताना उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्‍सिजन पुरेसा उपयोगात येत नाही. उपजिल्हा रुग्णालयात तयार केलेल्या 'डेडिकेटेड कोविड केअर सेंटर'मध्ये ६०पैकी निम्म्यापेक्षा अधिक खाटा रिक्त आहेत. आज १७ कोविड रुग्ण दाखल असून, ऑक्‍सिजनची आवश्‍यकता असणारे अत्यल्प आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Super 8s Schedule : भारतीय संघाचे 'सुपर ८' मधील वेळापत्रक ठरले; बघा कोणत्या तीन संघांचा सामना करणार अन् कधी...

Buldhana Crime: हुंड्याच्या छळामुळे विवाहितेने संपवले जीवन; पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

तुम्हालाही राग येतो? हृदय विकाराचा वाढतो धोका, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Update : राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांची निर्दोष मुक्तता

Sangli Fire : नशेखोरांकडून मोकळ्या इमारतीत आग; भरदिवसा धिंगाणा, महापालिकेच्‍या अग्निशमन दलाने आटोक्यात आणली आग

SCROLL FOR NEXT