File photo
File photo 
विदर्भ

सौंदड येथील हल्ला प्रकरणी 11 पोलिस निलंबित

सकाळवृत्तसेवा

भंडारा : सौंदड पुनर्वसन येथे गो-तस्करांनी गावकऱ्यांना केलेल्या मारहाणप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून जिल्हा पोलिस अधीक्षक विनिता साहू यांनी 11 पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले. सर्व निलंबित कर्मचारी अड्याळ पोलिस ठाण्यातील असून ठाण्याचे प्रभारी अधिकारी यशवंत किचक यांचाही त्यात समावेश आहे.
7 जुलैला सौंदड पुनर्वसन येथे जनावरे भरत असलेल्या ट्रकला बाजूला करण्यावरून वाद झाला. त्यानंतर 25 ते 30 संख्येत असलेल्या गो-तस्करांनी घराघरांत घुसून गावकऱ्यांना बेदम मारहाण केली. यात पुरुषोत्तम दामा केवट, भारत मेश्राम, सोमा निबांर्ते, चंद्रभान भुते हे गंभीर जखमी झाले. गावकऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली; पण, त्यांनी ते गांभीर्याने घेतले नाही. तसेच आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी ठाण्यात गोळा झालेल्या जमावावरही पोलिसांनी लाठीचार्ज केला.
जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या घटनेची प्राथमिक चौकशी केली. त्यात पोलिसांनी कर्तव्यात कसूर व दिरंगाई केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. त्यामुळे ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक यशवंत किचक, पोलिस नायक दर्शना टेंभूर्णे, पोलिस हवालदार अनिल नंदेश्‍वर, भगतसिंह बैस, ग्यानीराम बोरकर, दादाजी कठाणे, हरीश कांबळे, जितेंद्र भोगे, अरविंद सतदेवे, पोलिस शिपाई लिंगदेव निंबार्ते, मंगला शेडके, सहाय्यक फौजदार शरद गिऱ्हेपुंजे यांना निलंबित केले. निलंबित किचक यांना भंडारा मुख्यालयात; तर, इतर पोलिस कर्मचाऱ्यांना अड्याळ पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश आहे. या कारवाईमुळे पोलिस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT