dead_body
dead_body 
विदर्भ

नक्षलवाद्यांकडून आणखी दोघांची हत्या

सकाळवृत्तसेवा

गडचिरोली : नक्षलवाद्यांकडून आणखी 2 आदिवासींची हत्या करण्यात आली असून गागील 11 दिवसात पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन 7 जणांचा बळी गेला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून हत्या करण्याचे सत्र सुरुच असून धानोरा तालुक्यातील मार्केगाव येथे शनिवारी (ता. 2) दोन आदिवासींचा मृतदेह आढळून आले. गिरमा कुडयामी व समरु अशी मृतांची नावे असून ते दोघेही नक्षलवाद्यांच्या भितीने गेल्या अनेक दिवसांपासून गडचिरोली येथे राहत होते. शुक्रवारी ते आपल्या गावी गेले असता नक्षल्यांनी त्यांची हत्या केली.  

यापूर्वी 22 जानेवारीला भामरागड तालुक्यातील कसनासूर येथील 3 नागरिकांची नक्षल्यांनी हत्या केली होती. त्यांचे मृतदेह भामरागड-आल्लापल्ली मार्गावर फेकून दिले होते. तर दुसऱ्याच दिवशी अनेक ठिकाणी नक्षली बॅनर आढळून आले.  त्यानंतर एटापल्ली तालुक्यातील जारावंडी पोलीस मदत केंद्रांतर्गत येणाऱ्या ताळगुडा येथील सोनसाय तानु बेग याची हत्या केली तर बुधवारी कोरची तालुक्यातील बेळगाव येथे भाजीपाल्याचा ट्रक पेटवून दिला. तर त्याच रात्री गडचिरोली तालुक्यातील पोटेगाव जवळील मजगाव येथेही रस्ता कामावरही 2 जेसीबी व 4 ट्रॅक्टर नक्षल्यांनी पेटवून दिले होते. या सर्व घटना ताज्या असतानाच आज पुन्हा नक्षल्यांनी दोघांची हत्या केली केल्याने जिल्ह्यात सर्वञ दहशत पसरली आहे.

25 ते 31 जानेवारीपर्यंत नक्षल्यांकडून शहीद सप्ताह पाळण्यात आला होता. या सप्ताहादरम्यान नक्षल्यांनी अनेक ठिकाणी नक्षली बॅनर बांधून भीती निर्माण केली होती. काही ठिकाणी झाडे तोडून मार्गही रोखला होता. दरम्यान, शुक्रवारी दुपारी रस्त्यावर तोडून टाकलेले झाडे हटवताना बॉम्बस्फोट झाल्याची ही घटना ग्यारापत्ती जंगला जवळच्या देवसूर गावालगत घडली. हा छोटा स्पोट असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: दमदार सुरुवातीनंतर कोलकाताने गमावली पहिली विकेट; नवीन-उल-हकने आक्रमक खेळणाऱ्या ओपनरला धाडलं माघारी

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT