उमरेड ः विक्रमी कापूस उत्पादन घेणारे शेतकरी संजय वाघमारे.
उमरेड ः विक्रमी कापूस उत्पादन घेणारे शेतकरी संजय वाघमारे.  
विदर्भ

वाघमारेंच्या शेतात एकरी 25 क्‍विंटल "पांढरे सोने'

सतीश तुळसकर

उमरेड (जि.नागपूर) ः एकीकडे तालुक्‍यात पारंपरिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतमालाला अतिवृष्टीचा फटका बसला, तर दुसरीकडे दुष्काळातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तालुक्‍यातील नवेगाव साधूच्या शिवारात प्रगतीशील शेतकरी संजय वाघमारे (वय 45) हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रति एकरी 25 क्‍विंटल पांढरे सोने फुलविले आहे.

संजय वाघमारे यांचे वास्तव्य उमरेड तालुक्‍यात असून 8 किलोमीटर अंतरावरील नवेगाव साधू या त्यांच्या मूळगावी त्यांची मालकी हक्काची 25 एकर (10हेक्‍टर) शेतजमीन आहे. दुष्काळसदृश्‍य परिस्थितीत त्यांनी कृषी अधिकारी व कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनात आधुनिक तंत्रज्ञानाच्या भरवश्‍यावर लक्षणीय पीक घेऊन सभोवतालच्या शेतक-यांना प्रेरणा मिळेल, अशी प्रगत शेती करून दाखविली. 25 एकरचे विभाजन करत 4 एकरात उत्कृष्ट बियाणांची निवड केली. कृषी सहायक अधिकारी अरुण हारोडे यांच्या मार्गदर्शनात वाघमारे गेल्या तीन वर्षांपासून कापसाचे पीक घेत आहेत.

अशी केली बीजांची लागवड
बीजांची लागवड उत्तर-दक्षिण अशी पट्टापद्धतीने पाच बाय एक फूट अंतरावर प्रकाशनियोजन व्यवस्थापन होईल अश्‍यारितीने केली. लागवडीसाठी त्यांनी सरी-वरंबा पद्धतीऐवजी मातीची बेटे तयार केली. त्यामुळे मुळे पसरण्यासाठी अनुकूल माती मिळते आणि सभोवतालची जमीन पाणी आवश्‍यकतेनुसार शोषून घेते. नत्र, स्फुरद, पालाश ही खते पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला व राहुरी कृषी विद्यापीठ पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाच्या माती परीक्षण अहवालातून केलेल्या शिफारशीनुसार एकूण चार मात्रांमध्ये विभागणी करून देण्यात आली. खत उघड्‌या जमिनीवर न फेकता जमिनीत खड्डा करून टाकल्यामुळे त्याचा भरपूर फायदा झाडांना झाला. दोन रंगेमधील अंतर पाच फूट असल्यामुळे आंतरमशागती करिता छोटे कल्टीवेटर, रोटावेटर व खत पेरणीकरिता छोटे ट्रॅक्‍टर वापरणे सोयीचे झाले. तसेच पिकाची उंची पाच फुट झाल्यावर शेंडे कापण्यात आले. त्यामुळे पिकांची अनावश्‍यक उंची न वाढता फांद्या व फळे मोठ्‌या प्रमाणात आली. सरासरी एका झाडाला शंभर ते दीडशे बोंडे आलीत. एका एकरात आठ हजार झाडे आहेत.

लागवडीसाठी आलेला खर्च
बियाणे 30 हजार , फवारणीसाठी 2 लाख मजुरीसह, खत 2 लाख मजुरीसह, मजुरी-50 हजार रुपये ( मशागत व कचरा व्यवस्थापन) तसेच पूर्वनियोजन जमीन तयार करणे, ट्रॅक्‍टर व आंतरमशागतीसाठी 80 हजार रुपये खर्च आला. प्रति एकरात 20 ते 25 क्विंटल उत्पन्न होईल, म्हणजे एकूण 600 क्विंटल उत्पन्न होण्याची शक्‍यता आहे.

वाघमारे हे प्रगतशील शेतकरी आहेत. विद्यापीठाच्या शिफारशीनुसार वेळोवेळी केलेले मार्गदर्शनाचे काटेकोरपणे पालन करत त्यांनी पीक निवडीपासून ते कीड व्यवस्थापनापर्यंतच्या प्रक्रियेत शिवाय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत दुष्काळाच्या प्रतिकूल परिस्थितीत दमदार पीक घेतले आहे.
अरुण हारोडे
सहायक कृषी अधिकारी
उमरेड, पं.स.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

Vishal Patil: विश्वजीत कदमच आमचे नेते त्यांना मुख्यमंत्री करणारच, विशाल पाटलांनी सांगितला विजयानंतरचा प्लॅन

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात १६ नेत्यांना नोटीस, सात राज्यांमध्ये पोलिस पोहोचले

Shahrukh Khan : शाहरुखवर अबराम भडकला ; सोशल मीडियावर व्हिडीओ चर्चेत

SCROLL FOR NEXT