Aarni
Aarni 
विदर्भ

आर्णी शहराची 'आम्रनगरी'कडे वाटचाल

सकाळ वृत्तसेवा

आर्णी : आर्णी शहरात एक हजार आंम्रवृक्ष लागवड कार्यक्रमास आज (रविवार) पासून सुरूवात करण्यात आली. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास शहरातील ग्रीन पार्क येथे वृक्ष लागवड करून या कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. यावेळी 250 वृक्षांचे रोपण करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अर्चणा मंगाम होत्या. तहसीलदार श्रीकांत निळे, मुख्याधिकारी अमोल माळकर, तालुका कृषी अधिकारी रमेश पसलवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी रूपेश रोडगे, ठानेदार यशवंत बावीस्कर, विठ्ठलराव चौधरी, नगरसेविका अंजली खंदार, ज्योत्स्ना ठाकरे या वेळी  उपस्थित होते. 

आर्णी आम्रवृक्ष मंडळाच्या वृक्षलागवड शुभारंभासाठी माझ्या शुभेच्छा. या नियोजनबद्द कार्यक्रमासाठी मी वेळ दिला होता. परंतु वेळेवर अमरावतीला जावे लागले. त्यामुळे वृक्षलागवडीच्या कार्यक्रमाला येऊ शकलो नाही. परंतु या शहराला मी नक्की भेट देईन, अशा शब्दांत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी वृक्ष लागवड कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. 

आर्णी शहरात जागृत नागरिक नवनवीन संकल्पना साकार करून त्या यशस्वीपणे राबवतात. लोकसहभागातून सामाजिक चळवळ उभी करतात. अरुणावती नदी स्वच्छता अभियान, आर्णी प्रेस क्लब कडून ग्राम दत्तक योजना, आर्णी स्वच्छता अभियान, आर्णी सायकलींग क्लबच्या वतीने पर्यावरण संवर्धन असे नानाविध उपक्रम राबविण्यात आले आहेत.

त्याचप्रमाणे आर्णी शहरातील व्हाट्सअॅप गृपवर आंबा लागवडीच्या अनुषंगाने चर्चा झाली. आणि त्यातून 'घर तिथे आम्रवृक्ष' ही संकल्पना समोर आली. शहरातील काही तरूण एकत्र येऊन आंम्रवृक्ष मंडळाची स्थापना करण्यात आली आणि शहरातील नागरिकांमध्ये आंम्रवृक्ष लागवडीकरीता जनजागृती सुरू झाली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र शिवरामवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रमोद कुदळे यांनी केले, तर आभार संदीप ढोले यांनी मानले.

आर्णी शहरातील तरुण मंडळी खरोखर कौतुकास्पद कार्य करत आहेत. आम्रवृक्षची लागवड करून शहराचे नाव आंबानगरी व्हायला वेळ लागणार नाही. आर्णीचा हा प्रयोग यशस्वी झाला, तर महाराष्ट्रात आर्णी शहर हे रोल मॉडेल ठरेल.
- श्रीकांत निळे, तहसिलदार, आर्णी 

आंबा लागवडीसाठी शहरातील प्रत्येक नागरिक पुढे सरसावला आहे, ही अभिनंदनीय गोष्ट आहे. आज पर्यावरणाचे असंतुलन बघता झाडे लावने, हे क्रमप्राप्त झाले आहे. त्याची सुरुवात आंम्रवृक्ष मंडळाने केली. याला मोठे स्वरूप देऊन ग्रामीण भागातील नागरिकांनीसुद्धा अशा प्रकारे शेतात वृक्ष लागवड करावे. त्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. आम्ही हवी ती मदत करायला तयार आहे. 
- रमेश पसलवाड, तालुका कृषी अधिकारी, आर्णी.

आर्णी नगर परिषद क्षेत्रात वृक्षलागवडीचे काम होत आहे, याचा मला अभिमान आहे. आम्ही नगरपरिषदेचे सर्व प्रशासकीय यंत्रणा आपल्यासोबत आहोत. आम्रवृक्ष मंडळाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. मी अनेक शहरामध्ये काम केले, पण अशा प्रकारचे पर्यावरण संवर्धन तथा सामाजिक बांधिलकी जोपासनारे काम कुठेच दिसले नाही. आर्णी शहरातील तरुणाई खरच सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असते. आपणास हवी असेल ती मदत करायला तयार आहे. आपल्या शहराची ओळख महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही.
- अमोल माळकर, मुख्याधिकारी, न. प. आर्णी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT