253 farmers committed to suicide in eleventh months in amravati  
विदर्भ

बापरे! एकाच जिल्ह्यात ११ महिन्यात २५३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मदतीसोबत हवा मानसिक आधार

सुरेंद्र चापोरकर

अमरावती : सततची नापिकी, नैसर्गिक संकटासह कर्जाचा वाढता डोंगर यामुळे त्रस्त झालेल्या 253 शेतकऱ्यांनी गेल्या अकरा महिन्यात आत्महत्या केल्या आहेत. अमरावती जिल्ह्याची आत्महत्याग्रस्त जिल्हा ही ओळख त्यामुळे पुसली जाऊ शकली नाही. विशेष म्हणजे कर्जमुक्तीच्या छायेत या आत्महत्या झाल्या आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. 

1 जानेवारी ते 23 नोव्हेंबर या कालावधीत अमरावती जिल्ह्यातील 253 शेतकऱ्यांनी विविध मार्गाने आत्महत्या केल्या आहेत. यंदाच्या खरीप हंगामात म्हणजे जून ते ऑक्‍टोबर या कालावधीत 108 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवून घेतली. जुलैमध्ये म्हणजे पेरणी आटोपल्यानंतर 31, तर पीक येण्याच्या कालावधीत सप्टेंबरमध्ये 30 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची जिल्हा प्रशासनाने नोंद केली आहे. यावर्षी (वर्ष 2020) जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यात 253 शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांची नोंद असून त्यापैकी 109 शेतकरी शासकीय मदतीसाठी पात्र ठरले आहेत. शासकीय निकषात बसू न शकलेल्या 72 शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात आले. 72 प्रकरणांमध्ये चौकशी सुरू असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने म्हटले आहे.

वर्षभरातील आत्महत्या -

महिना पात्र अपात्र चौकशीसाठी प्रलंबित एकूण
जानेवारी 15 09 00 24
फेब्रुवारी 20 07 00 27
मार्च 07 04 03 14
एप्रिल 06 07 00 13
मे 18 09 02 19
जून 21 07 01 29
जुलै 12 15 04 31
ऑगस्ट 07 09 09 25
सप्टेंबर 03 05 22 30
ऑक्‍टोबर 00 00 23 23
नोव्हेंबर 00 00 08 08
एकूण 109 72 72 253

शेतकरी धोरण व कायद्यांमध्ये बदल आवश्‍यक -

शेतकरी संघटनेचे नेते व शेतकरी प्रश्‍न, समस्यांवर अभ्यास करणारे विजय विल्हेकर यांच्या मते शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागे शासकीय नियम, कायदे अधिक कारणीभूत आहेत. पीक कर्ज काढणाऱ्या शेतकऱ्यांना दरवेळी बॅंकांचे ना हरकत प्रमाणपत्र आणण्यास सांगितले जाते. हे प्रमाणपत्र जमा करताना दमछाक होते. कसेबसे कर्ज मिळाले तर लाखो रुपये किमतीचे शेत हजार रुपयांत गहाण पडते. आत्महत्या टाळायच्या असतील तर दरवर्षी पीककर्ज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे. आधारकार्ड बँक खात्यांसोबत जोडले गेल्याने बँकांना ते शक्‍य आहे. हंगामातील पिकांवर कर्जाची वसुली करावी. शासकीय नियम व कायद्यांमध्ये बदल करण्यासोबतच शेतकरी विरोधी धोरण रद्द करणे आवश्‍यक आहे. कर्जमाफी किंवा कर्जमुक्तीने आत्महत्या थांबणाऱ्या नाहीत. त्यासाठी या आधारांसोबत मानसिक आधार देणे आवश्‍यक आहे.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT