विदर्भ

311 वर्षांच्या शाही चांदीच्या महालक्ष्मींची आज स्थापना

सकाळ वृत्तसेवा
महाल : सिनिअर भोसला पॅलेस येथील 311 वर्षे जुन्या शाही चांदीच्या महालक्ष्मी व गणपतीची स्थापना उद्या गुरुवार (ता. 5) रोजी करण्यात येत आहे. परंपरेनुसार चालत आलेल्या महाल येथील श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोसले यांच्या निवासस्थानी सिनिअर भोसला पॅलेस, महाल, नागपूर येथे गणपती व महालक्ष्मीला यंदा 311 वर्षे पूर्ण झाली आहेत.
नागपूर शहरातील सर्वांत प्रथम महालक्ष्मी असून, 1708 पासून अखंडित या महालक्ष्मींची स्थापना करण्यात येत आहे. ही प्रथा नियमित या पुढेही चालू राहील, असे राजे मुधोजी भोसले यांनी सांगितले. या महालक्ष्मी नागपूर भोसले राजघराण्यातील असल्यामुळे यांना शाही महालक्ष्मी म्हणूनही संबोधण्यात येतात. जुन्या अलंकार जडीत चांदीच्या महालक्ष्मींची स्थापना परंपरेनुसार याहीवर्षी होत आहे. श्रीगणेशाची मूर्तीसुद्धा स्थापन झाली आहे. या गणपतीची विशेषतः 311 वर्षांपासून एका आकाराचा, एका रंगाचा नागपूरकर भोसलेकालीन डोक्‍यावर तुरा असलेली पगडी घालून या गणपतीरायांना पालखीत आणले जाते व विसर्जनाच्या दिवशीही पालखीत जातात. परंपरागत सोनल कोहाड परिवार ही मूर्ती बनवितात. या गणपतीचे विसर्जन दरवर्षी दशमीला होते. या वर्षी दशमी ता. 8 सप्टेंबरला येत आल्यामुळे रविवारी (ता. 8) दुपारी चारला विसर्जन मिरवणूक निघेल. हा गणपती नागपूरचा पहिल्या मानाचा जुना गणपती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

MDH Everest Masala: एमडीएच आणि एव्हरेस्ट वादात सरकारचा मोठा निर्णय; आता सर्व राज्यांमध्ये होणार मसाल्यांची चाचणी

Yed Lagla Premacha: भिर्रर्र...'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत बघायला मिळणार बैलगाडा शर्यतीचा थरार, पाहा प्रोमो

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT