Yavatmal Cylinder Blast e sakal
विदर्भ

पती पदयात्रेत, घरात सिलिंडरचा स्फोट; गर्भवती पत्नीसह चिमुकली ठार

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : पती देवाला साकडं घालण्यासाठी गेला असताना घरी सिलिंडरचा स्फोट (Yavatmal Cylinder Blast) झाला. यामध्ये गर्भवती पत्नीसह ४ वर्षीय चिमुकली ठार झाली. एका क्षणात हसतं-खेळतं कुटुंब उद्धवस्त झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी (Aarni Yavatmal) तालुक्यातील आयता गावात ही घटना घडली.

काजल जयस्वाल आणि चिमुकली परी जयस्वाल, असं मृत मायलेकींचं नाव आहे. आयता गावात विनोद जयस्वाल आपल्या कुटुंबासह राहत होते. विनोद यांना धामणगाव येथील मुंगसाजी महाराजांवर श्रद्धा होती. आज ९ मार्चला धामणगाव येथे पुण्यतिथी सोहळा असतो. त्यासाठी गावातून पदयात्रा जात असते. याच पदयात्रेत विनोद गेला होता. सुखी आयुष्यासाठी तो देवाला साकडं घालण्यासाठी गेला होता. पण, तो धामणगावात पोहोचला आणि त्याची गर्भवती पत्नीसह चिमुकली आगीत होरपोळून ठार झाले.

पत्नी काजल या गर्भवती असल्यानं चार वर्षीय चिमुकली परीसह घरीच होत्या. त्यांनी आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास स्वयंपाक करण्यासाठी गॅस पेटवला असता गॅसने भडका घेतला. यामध्ये सिलिंडरचा स्फोट झाल्याने घरातील संपूर्ण वस्तूने आगीत भडका घेतला. यामध्ये काजल आणि परी दोघीही जळून खाक झाल्या. तसेच घरासमोरील उंबराचे झाड देखईल भस्मसात झाले. घटनेची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांना मिळताच त्यांनी घांटजी येथील अग्निशमन दलाला पाचारण केले. परंतु, ते पोहचण्यापूर्वीच गावातील नागरिकांनी आजूबाजूचे बोअरवेल चालू करून आग आटोक्यात आणली. पण दोघी मायलेकींना वाचवता आले नाही. त्यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारतीय संघ सेमीफायनलमध्ये! न्यूझीलंडचे पराभवासह आव्हान संपलं; स्मृती मानधना-प्रतिका रावल विजयाच्या नायिका

Raireśhwar Fort Incident VIDEO : रायरेश्वर किल्ला परिसरात दारू पार्टी करणाऱ्या परप्रांतीय तरूणांना शिवप्रेमींकडून चोप!

Ambulance Fire : मध्यरात्री लातूरकडे जाताना ॲम्बुलन्स जळून खाक! डॉक्टरांनी दाखवले प्रसंगावधान, महिलेचा जीव वाचला

Lonar News : समृद्धी महामार्गावर मोठी कारवाई! संशयास्पद कंटेनर चालकाजवळ आढळले देशी पिस्तूल व जिवंत काडतुसे

PM Kisan Yojana News: पीएम किसान योजनेच्या २१ व्या हप्त्याबाबत नवीन अपडेट; जाणून घ्या, २००० रुपये कधी येणार?

SCROLL FOR NEXT