rail way
rail way  e sakal
विदर्भ

रेल्वे फाटक होणार इतिहासजमा, नागपूर विभागातील ४०० फाटक बंद करण्याचे प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अपघातमुक्त रेल्वे वाहतुकीसाठी (railway) नागपूर विभागाने (nagpur devision) मानवरहित रेल्वे फाटक ही संकल्पनाच हद्दपार करण्यात यश मिळवले आहे. आतापर्यंत सुमारे ४०० मानवयुक्त रेल्वे फाटक असून टप्प्या टप्प्याने तेसुद्धा कायमस्वरूपी बंद करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. (400 railway get will close soon in nagpur division)

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचा विचार केल्यास इतवारी-नागभीड, लामटा-समनापूर, चिरई डोंगरी-मंडला, नैनपूर-छिंदवाडा या मार्गांवर सुमारे १६४ मानवरहित फाटक होते. गेज परिवर्तन प्रकल्पांतर्गत पर्यायी उपाययोजनांद्वारे हा प्रश्न मार्गी लावण्यात आला. २०१४ साली मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात २८६ मानवयुक्त फाटक होते. ही संख्या आज १८३ वर आली आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील ११ रेल्वे फाटक गेल्या दोन वर्षांत पर्यायी उपाययोजनेनंतर बंद करण्यात आले असून सध्या २१७ मानवयुक्त फाटक अस्तित्वात आहेत.

फाटकांऐवजी रोड ओवर ब्रिज (आरओबी), रोड अंडर ब्रिज (आरयूबी) आणि लिमिटेड हाइट सब वे (एलएचएस) ची उभारणी करून रस्ते वाहतूक वळविण्यात येत आहे.

यंदा १० जूनला जागरुकता दिन -

जगभरात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय समपार फाटक जागृकता सप्ताह पाळला जात असून साधारणपणे ८ जून आंतरराष्ट्रीय जागृकता दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा मात्र कोरोनाच्या सावटामुळे भारतीय रेल्वेकडून १० जून रोजी हा दिवस साजरा केला जाणार आहे. रेल्वे अपघात मोठ्या प्रमाणावर वित्त व जीवितहानीचे कारण ठरू शकतो. यामुळेच हा दिवस महत्त्वाचा आहे.

विभागातील मानवयुक्त रेल्वे फाटक

  • मध्य रेल्वे - १८३

  • दपूमरे - २१७

नागरिकांना आवाहन -

  • बंद रेल्वे फाटक ओलांडू नका

  • वाहन फाटकापूर्वीच उभे ठेवा

  • फाटक ओलांडताना मोबाईल किंवा हेड फोनचा वापर टाळा

  • दोन फाटकांच्या मध्ये वाहन उभे करू नका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rally: पुतिन जसं विरोधकांना संपवतात, तसाच प्रयत्न मोदींकडून सुरु; अरविंद केजरीवाल यांचा घणाघात

Mega Block : रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल!

Microsoft linkedin Work Trend: भारतातील किती टक्के कर्मचारी कामाच्या ठिकाणी AI चा वापर करतात?

Karad News : कऱ्हाड बाजार समितीत कोल्हापूरच्या शेतकऱ्याच्या गुळाने खाल्ला भाव; क्विंटलला मिळाला 'इतका' उच्चांकी दर..

Latest Marathi News Live Update: PM मोदी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना केलं अभिवादन

SCROLL FOR NEXT