संग्रहित छायाचित्र 
विदर्भ

टार्गेट निश्‍चित, पण नेमके कशाचे? वाचा...

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : राज्यातील सर्व गावांमध्ये नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, यासाठी केंद्र सरकारच्या सहकार्याने सार्वजनिक शौचालय अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे.

या अभियानांतर्गत अमरावती जिल्ह्यात पाणी व स्वच्छता विभागाच्या माध्यमातून 450 शौचालय बांधकामाचे टार्गेट ठरविण्यात आले आहे. मात्र यावर्षी 100 शौचालये पूर्ण करण्यावर भर दिल्या जाणार आहे. अनेकदा गावांमध्ये काही व्यावसायिक किंवा काही कामानिमित्त आलेल्या शहरातील नागरिकांना शौचालयाकरिता जागा उपलब्ध नसल्याने ते उघड्या जागेचा वापर करतात. ते टाळण्यासाठी सामूहिक शौचालय निर्माण करण्याचे या अभियानात अभिप्रेत आहे. गाव, बाजाराची ठिकाणे, धार्मिकस्थळे अशा ठिकाणी सामुदायिक शौचालये बांधण्यात येणार आहेत.

सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बाह्य शहरांतून स्थलांतरित कामगार मोठ्या संख्येने त्यांच्या मूळगावी परतले आहेत. अशा स्थलांतरित कामगारांना प्राधान्याने स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून देणे आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकारच्या वतीने 15 जून ते 15 सप्टेंबर या कालावधीत सामुदायिक शौचालय अभियान राबविण्यात येत आहे. सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग घेऊन हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे आणि पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी यांनी केले आहे.

गावांमध्ये स्थलांतरित कामगारांना शाश्‍वत स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून देणे, हा या अभियानाचा उद्देश असून त्यासाठी राज्यस्तरावरून सर्वोत्कृष्ट तीन सरपंचांची निवड केली जाणार आहे. यात ग्रामपंचयातींना विशेष पुरस्कार दिले जाणार आहेत.
श्रीराम कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी व स्वच्छता विभाग.

संपादन - नरेश  शेळके

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT