fire  
विदर्भ

भीषण! गोठ्याला लागलेल्या आगीत ५ बैलांचा अक्षरशः कोळसा; तब्बल ८ लाखांचं नुकसान 

सकाळ डिजिटल टीम

सिंदी (जि. वर्धा) :  शहरातील कृषी केंद्र व्यावसायिक तसेच शेतकरी मधुकर लिखार यांच्या मौजा मारडा शिवारातील कांढळी रस्तालगतच्या शेतातील गोठ्याला मंगळवारी (ता. 16) रात्री 7 ते 8 वाजता दरम्यान अचानक आग लागली. या आगीत पाच बैलांचा होरपळून मृत्यू झाला. शेती साहित्य, वैरणाची राखरांगोळी झाली. या घटनेत सात ते आठ लाखांचे नुकसान झाले.

गोठ्याला आग लागल्याची माहिती शहरात पसरताच आग विझविण्यासाठी घटनास्थळी सर्वांनी एकच धाव घेतली. मात्र, आगीचे रौद्ररूप एवढे भयानक होते की, गोठ्यात बांधलेल्या सहा बैलांपैकी पाच बैलांचा जागीच कोळसा झाला. तर एक बैल दावे तोडून पळाल्याने बचावला. सोबतच साठ एकर शेती वाहण्यासाठी लागणारे शेती साहित्य आणि तीन बैल जोड्यांना वर्षभर पुरेल एवढे वैरण जळून खाक झाले.

लगतच्या मारडा शिवारात शहरातील शेतकरी मधुकर लिखार यांची मोठी शेती आहे. तीन जोड्यांची जमीन असल्याने असंख्य वर्षापासून येथेच त्यांचा टिनाचा मोठा गोठा आहे नेहमीप्रमाणे मंगळवारीसुद्धा सालकऱ्यांनी दिवसभर शेतातील कामे केली. सांयकाळी चारापाणी करून सहाही मुगलाई जातीचे बैल गोठ्यात बांधून सात वाजता घराकडे आले. 

आठ वाजतादरम्यान गोठ्याला आग लागल्याची माहिती मिळाली. आग विझविण्यासाई असंख्य हात मदतीसाठी धावले. शहरात आगीचे असंख्य नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले. यासाठी नगरपालिकेचा अग्निशमन बंबसुद्धा आला, परंतु तोपर्यंत बराच उशीर झाला होता.

या आगीत पाच बैलांचा जागीच कोळसा झाला तर एक बैल पळाल्याने बचावला. मात्र, तोही गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची सिंदी पोलिसांनी नोंद घेतली. तर समुद्रपूर तालुका महसूल विभागाने पंचनामा केला असून सात ते आठ लाख रुपयांच्या नुकसानीची नोंद केली आहे. ही आग नेमकी कशाने लागली, याबाबत अद्याप कळले नाही. पुढील तपास पोलिस करीत आहे.

अग्निशमनबंब पांढरा हत्ती

स्थानिक नगरपालिकेचे अग्निशमन वाहन आहे. या वाहनावर प्रशिक्षित कर्मचारी नाही. शिवाय चालक नागपूर येथून ये-जा करतो. त्यामुळे आग लागल्यास अग्निशमनबंब वेळेवर घटनास्थळी पोहोचत नाही. दुसऱ्या चालकाची मदत घेतली जाते. गोठ्याला आग लागल्यानंतर वेळेत अग्निशमन दलाचे वाहन पोहोचलेच नाही. वेळेवर वाहन पोहोचले असते तर एक दोन बैलांचा जीव वाचला असता, असे नागरिकांचे म्हणणे आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT