file photo
file photo 
विदर्भ

राज्यातील 77 तेंदूपत्ता युनिट "अनसोल्ड'

सकाळवृत्तसेवा

नागपूर : राज्यातील ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला हातभार लावणाऱ्या तेंदूपत्ता लिलावाला यंदा मागणी नसल्याने सात राउंडनंतरही महाराष्ट्रातील सरासरी 77 युनिटची विक्री झालेली नाही. परिणामी, शासनासह तेंदूपत्ता तोडणाऱ्या मजुरांनाही आर्थिक फटका बसण्याची शक्‍यता आहे. 218 युनिट विक्रीसाठी होते, त्यातील फक्त 204 युनिटची विक्री झाल्याने यावर्षी 2 लाख 48 हजार 330 प्रमाणगोणी तेंदूपत्ता गोळा होणार आहे.
राज्यातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ, बुलडाणा, वर्धा, बीड, हिंगोली, औरंगाबाद, परभणी, नांदेड, अमरावती या परिसरातील जंगलामध्ये तेंदूच्या झाडांची संख्या अधिक आहे. वन विभाग तेंदूपत्ता युनिटचे ई ऑक्‍शनने लिलाव केल्या जातो. यातून मजुरांच्या हाताला उन्हाळ्यात काम मिळते. उन्हाळ्यात शेतीची फारशी कामे राहत नसल्याने ग्रामीण भागातील मजुरांची रोजगाराच्या शोधात भटकंती सुरू होते. मात्र, या मजुरांना तेंदूपत्ता हंगामामुळे मोठी मदत होत असते. मजुरांचे अख्खे कुटुंब या कामात व्यस्त असतात. तेंदूपत्ता मजुरांना बोनसदेखील दिला जातो. यंदा राज्यातील विविध भागांतील 77 तेंदूपत्ता युनिटचा लिलावच झाला नाही. यामागे तेंदूपत्ता युनिट लिलावाचे वाढलेले दर हे कारण असल्याचे बोलले जात आहे.
गतवर्षी शासनाने तेंदूपत्ता लिलावाच्या दरात तीन ते चारपट वाढ केली होती. मात्र, त्या तुलनेत तेंदूपत्ता तोडणी न झाल्याने ठेकेदारांना आर्थिक फटका बसल्याची माहिती आहे. यामुळेही यंदा तेंदूपत्ता लिलावाकडे पाठ फिरविल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे, सातवेळा लिलाव प्रक्रिया घेऊनदेखील तेंदूपत्ता ठेकेदारांचा कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. वन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तेंदूपत्ता युनिट लिलावाचे दर कमी करण्यात आले आहे. मात्र, यानंतरही लिलाव होत नसल्याने या विभागाची चिंता वाढली आहे. यावर्षी 77 युनिटमधील 74 हजार 108 प्रमाण गोणीची विक्री झालेली नाही. गडचिरोली जिल्ह्यातील 25 पैकी पूर्ण युनिटची विक्री झाली. नागपूर वन वृत्तातील 93 पैकी 80 युनिट विक्री झाली. ताडोबामधील नऊपैकी नऊ युनिटची विक्री झालेली आहे. एकूण विक्री झालेल्या 204 युनिटमधून 38 कोटी 62 लाखांचा महसूल मिळणार आहे. गतवर्षी 50 कोटींचा महसूल प्राप्त झाला होता.
राज्यात एकूण 281 युनिट
महाराष्ट्रातील विविध ठिकाणी एकूण 281 तेंदूपत्ता युनिट आहे. सातव्या राउंडमध्येसुद्धा 77 युनिटचा लिलाव झालेली नसल्याने 74 हजार 108 प्रमाण गोणी गोळा होणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT