Nagpur Accident News Esakal
विदर्भ

Nagpur Accident News: रविवार ठरला अपघातवार! वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू; पती-पत्नीसह अख्खं कुटुंब संपलं

Nagpur Accident News: रविवारी सर्वत्र होळीचा उत्साह असताना विदर्भ मात्र तीन अपघातांनी हादरला. तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तब्बल नऊ जण गतप्राण झाले.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर: रविवारी सर्वत्र होळीचा उत्साह असताना विदर्भ मात्र तीन अपघातांनी हादरला. तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तब्बल नऊ जण गतप्राण झाले. यात अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात पती-पत्नीसह एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. दुसरा अपघात वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात झाला. त्यात तिघांचा मृत्यू झाला. तर अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात परतवाडा-धारणी मार्गावर बस दरीत कोसळल्याने दोन महिलांचा मृत्यू झाला. बस झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला असून, या घटनेत २५ प्रवासी जखमी झाले.

धारणी (जि. अमरावती)पासून दहा किलोमीटर अंतरावर धारणी ते टिटंबा मार्गावर घुटी गावाजवळ कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पती-पत्नीसह दोन चिमुकले अशा चौघांचा जागीच मृत्यू झाला. दिनेश नंदलाल दारसिंबे (वय २९), शारदा दिनेश दारसिंबे (वय २५), युग दिनेश दारसिंबे (वय ६), युवराज दिनेश दारसिंबे (वय ४) सर्व रा. धोत्रा अशी मृतांची नावे आहेत. रविवारी (ता. २४) सायंकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास ही घटना घडली.

धोत्रा गावातील दारसिंबे कुटुंब होळीनिमित्त बाजारात खरेदी करून होळी साजरी करण्याकरिता गावाकडे दुचाकीने (क्र. एमएच २७ बीपी १९५५) परत जात होते. होळीसाठी मनाजोगी खरेदी केल्याने मुले आणि दाम्पत्य आनंदात होते. मात्र, घुटी गावाजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारने (क्र. एमएच २९ एआर १४५६) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

यात दुचाकीवरील चौघांचा जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थांनी अपघाताची माहिती धारणी पोलिसांना दिली. आमदार राजकुमार पटेल, प्रकाश घाडगे हेही रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहोचले.

मदतीसाठी थांबलेल्या कारवर धडकला टिप्पर; दोन अपघातात पाच जणांचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात अपघातग्रस्त दुचाकीचालकाला मदत करण्यासाठी थांबलेल्या कारवर भरधार टिप्पर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या अपघातात अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात परतवाडा-धारणी मार्गावर बस दरीत कोसळल्याने दोन महिलांचा मृत्यू झाला. या घटनेत बस झाडाला अडकल्याने मोठी दुर्घटना टळली असली तरी २५ प्रवासी जखमी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: जंतर-मंतर आंदोलनानंतर आता शाळांवर अभिजीत दिपकेंचा फोकस! शाळा सुधारा अभियान राबवणार; 'या' जिल्ह्यातून शुभारंभ होणार

‘तुम्ही बीवी पगलू आहात?’ KBC 18 मध्ये अमिताभ बच्चन यांना थेट सवाल; म्हणाले, ‘मी जयाचा...’

Marathi News Live Updates :  दोन-चार दिवसांत 5 ते 10 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील, कृषीमंत्र्यांची घोषणा 

Swapnil Lande Bhondubaba News: पुण्यात संतापजनक प्रकार! १०वीत चांगले मार्क मिळवून देण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण

Genelia Emotional Post: पप्पा, मुलांची आणि तुमची भेट व्हायला हवी होती... सासरे विलासराव देशमुख यांच्यासाठी जिनिलियाची खास पोस्ट; म्हणाली- तुम्ही...

SCROLL FOR NEXT