file photo
file photo 
विदर्भ

ग्रामपंचायतींच्या 92 जागा बिनविरोध

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : जिल्ह्यातील 251 ग्रामपंचायतींमध्ये रिक्त असलेल्या 401 पदांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला होता. त्यापैकी 92 जागा बिनविरोध झाल्यात. दोन ठिकाणी सार्वत्रिक, तर 11 ठिकाणी आज रविवारी (ता.23) मतदान झाले. दुपारी साडेतीनपर्यंत दोन सार्वत्रिक निवडणुकीसाठी 43 टक्के मतदान झाले होते. राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला होता. जुलै 2019 ते सप्टेंबर 2021मध्ये मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक जाहीर करण्यात आली होती. रिक्त असलेल्या सरपंच व उपसरपंच तसेच सदस्यपदाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रमही निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. जिल्ह्यातील खडकसावंगा, मालापूर, बारड या तीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. शिवाय 251 ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक घेतली जाणार होती. पोटनिवडणुकीच्या 401 जागांपैकी 92 जागा बिनविरोध झाल्या असून, रविवारी (ता.23) एकूण 11 जागांसाठी मतदान झाले. बाभूळगाव तालुक्‍यातील मालापूर व खडगसावंगा या दोन सार्वत्रिक निवडणुकीसाठी दुपारी साडेतीनपर्यंत 43 टक्के मतदान झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT