accident on samruddhi expressway
accident on samruddhi expressway sakal
विदर्भ

Accident : समृद्धी महामार्गावर अपघात; आयशर चालक ठार, तीन जखमी

सकाळ वृत्तसेवा

सिंदखेड राजा - तालुक्यामधुन जाणाऱ्या समृध्दी महामार्गावर अपघात होवून वाहन चालक ठार झाला असून ३ जण जखमी झाले. ही घटना सिंदखेड राजा नजिक समृद्घी महामार्गावर चॅनेल नंबर ३१३.२ वर नागपूर कॉरिडोर आज 11 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली आहे.

सविस्तर वृत्त असे की, समृद्धी महामार्गाने आयशर क्रमांक एमएच ०४ के एफ ८७४० हे मुंबई वरून कलकत्ताकडे जात असताना पाठीमागून येणारा ट्रक क्रमांक एमएच ४८ सी क्यू ४८२८ च्या चालकांने भरधाव वेगाने पाठीमागून आयशला धडक दिली. यात आयशर साईड सिमेंट बॅरिअरला धडकून पलटी झाला.

यात आयशर चालक रंजित गौतम (वय ४० वर्ष) रा. सुलतानपूर उत्तरप्रदेश यांचा जागेवर मृत्यू झाला आहे. संतोष छोटूलाल हरिजन (वय २५) उरण मुंबई, महिंद्र गौतम (वय ५०) रा सुलतानपूर उत्तरप्रदेश, सोनू गौतम (वय ३०) रा सुलतानपूर उत्तरप्रदेश हे तीन जण किरकोळ जखमी झाले.

जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक गजानन उज्जैनकर, शैलेश पवार, पोहेकॉ काळुसे, पो. कॉ. सानप, एमएसएफ जवान गजानन जाधव,नागरे, राठोड, क्यू आर व्ही टीम उपस्थित होती. बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT