truck.
truck. 
विदर्भ

विचित्र अपघात! तीन ट्रकला उडवून तो ट्रक धडकला पेट्रोल पंपावर आणि...

संतोष ताकपिरे

अमरावती : अमरावती ते नागपूर महामार्गावर अनुराधा पेट्रोलपंपाजवळ शुक्रवारी (ता.23) पहाटे साडेचारच्या सुमारास झालेल्या विचित्र अपघातात चालक व क्‍लीनर अशा दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात पेट्रोलपंपावरील एक कर्मचारी गंभीर जखमी झाला.

पहाटे चालकास डुलकी आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले. डब्ल्यू बी 23 सी 8700 क्रमांकाचा ट्रक मिरचीचा माल घेऊन औरंगाबाद येथून पश्‍चिम बंगालकडे जात होता. आधी या ट्रकने अनुराधा पेट्रोलपंपासमोर बाहेर उभ्या असलेल्या एमएच 20 एटी 5631, एमएच 27 एस 7998 व एमएच 04 सीए 7950 या तीन ट्रकला उडविले.

त्यानंतर पेट्रोलपंपाच्या मिटर मशीनला कट मारला, याच मशीनलगत अंडरग्राऊंड पेट्रोलची टाकी आहे. पंपावरील पेट्रोलच्या मशीनचे थोडेफार नुकसान झाले. ओटाही तुटला. तेथून हा ट्रक सुरक्षाभिंतीवर जाऊन जोरदार धडकला. त्यात ट्रकच्या केबीनमध्ये असलेल्या चालक व क्‍लीनर या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील मृत व्यक्तींची नावे स्पष्ट झाली नव्हती. नांदगावपेठ पोलिसांनी त्याबाबत ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या मालकाशी संपर्क साधला असता, मृत चालक व क्‍लिनरची नावे समजू शकली नाही.

अपघातात ड्यूटीवर उपस्थित पेट्रोलपंपावरील कर्मचारी मंगेश रमेश पकडे (वय 40, रा. नांदगावपेठ) हा जखमी झाला. त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातग्रस्त ट्रकच्या केबीनमध्ये चालक व क्‍लिनरचे मृतदेह अडकले होते. ते बाहेर काढण्यासाठी पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली. दोन तासानंतर मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवागारात पाठविण्यात आले. ज्या तीन उभ्या वाहनांना उडवून अपघाग्रस्त ट्रक पेट्रोलपंपाचे परिसरात घुसला त्यापैकी दोन ट्रकचेही बरेच नुकसान झाले.

सविस्तर वाचा -  मला कोरोना झाला तर?

मोठा अनर्थ टळला
अपघातस्थळावरील परिस्थिती भयंकर होती. ट्रकने पेट्रोलच्या अंडरग्राऊंड टाकीवर चढून मशीनला कट मारल्यानंतर स्पार्किंग होऊन स्फोट होण्याचीही भीती होती. सुदैवाने तसे काहीच घडले नसल्याने अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

बक्षिसाची रक्कम पटकाविण्यासाठी वेग
निर्धारित वेळेच्या काही तासांपूर्वीच जर ठरलेल्या ठिकाणी कच्चा माल पोहोचवून दिला. तर, त्या चालकास बक्षिसाच्या स्वरूपात ठराविक रक्कम देण्याची पद्धत ट्रान्सपोर्ट व्यवसायात अद्याप सुरू आहे. त्या रकमेच्या हव्यासापोटी अनेक चालक वेगाने वाहन चालवित असल्याचे बोलले जाते.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT