Accident of worker in Chandrapur Thermal power Plant
Accident of worker in Chandrapur Thermal power Plant  
विदर्भ

चंद्रपूर औष्णिक वीज केंद्रात अपघात, कामगाराच्या हातांना आणि मेंदूला गंभीर दुखापत

सकाळ डिजिटल टीम

चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील युनिट क्रमांक पाचमध्ये काम करीत असताना सुमारे आठ मीटर उंचीवरून पडल्याने कामगार जखमी झाला. ही घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली. विशाल देवगावकर (वय 29) असे जखमी कामगाराचे नाव आहे. दोन्ही हात आणि मेंदुला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकाराला कंत्राटदाराचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप कामगारांकडून केला जात आहे.

वीज केंद्राच्या युनिट क्रमांक 5 मधील एसी ड्रकमध्ये विशाल देवगावकर हा कंत्राटी कामगार म्हणून काम करीत आहे. गुरुवारी सकाळी विशाल नेहमीप्रमाणे कामावर गेला. आठ मीटर उंचीवर तो काम करीत होता. अचानकपणे लाकडी काठ्यांचे जुगाड तुटले. 

यात विशाल जमीनीवर कोसळला. विशालचे दोन्ही हात मोडले असून, मेंदुला गंभीर दुखापत झाली आहे. या अपघातानंतर युनिटमधील सर्व मजुरांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

जखमी अवस्थेला विशालला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कामगार सेनेचे बंडू हजारे यांनी घटनास्थळाला भेट देऊन जखमी कामगाराचा वैद्यकीय खर्च कंत्राटदाराने द्यावा, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात मुख्य अभियंता पंकज सपाटे यांची भेट घेऊन कंत्राटी कामगारांना सुरक्षा पुरविण्यात यावी, यासाठी निवेदन देण्यात येणार असल्याचे हजारे यांनी सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

'मुझे क्यों तोड़ा'; कंगना रनौतने भर सभेत तेजस्वी सूर्यांवर केली टीका; नेमका काय घोळ झाला?

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी आज राम मंदिरात जाऊन घेणार रामलल्लाचे दर्शन

SCROLL FOR NEXT