accused domestic relationship Umesh Kolhe Amravati Murder
accused domestic relationship Umesh Kolhe Amravati Murder  accused domestic relationship Umesh Kolhe Amravati Murder
विदर्भ

एका आरोपीचे कोल्हेंशी घरगुती संबंध; अंत्ययात्रेत झाला होता सहभागी

सकाळ डिजिटल टीम

अमरावती : शहरातील मेडिकल व्यावसायिक उमेश शंकरराव कोल्हे (५४) यांच्या हत्याप्रकरणात (Murder) पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. या आरोपींपैकी युसूफ खान याच्याशी उमेश कोल्हे यांचे घरगुती संबंध होते. युसूफ खान नेहमीच कोल्हेंच्या दुकानात जात होता. कोल्हेंच्या अंत्ययात्रेतसुद्धा युसूफ खान सहभागी झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

भाजपच्या (BJP) निलंबित नेत्या नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याने उमेश कोल्हे यांची हत्या झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी अमरावती पोलिसांना तब्बल अकरा दिवसांचा कालावधी लागला. एनआयएची चमू अमरावती शहरात दाखल होऊन दोन दिवस प्राथमिक चौकशी सुरू केली. त्यानंतरच अमरावती पोलिसांनी यासंदर्भात अधिकृत भाष्य केले.

उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी (Police) शनिवारी सातव्या संशयित आरोपीला अटक केली. रविवारी त्याला न्यायालयात हजर करण्याची तयारी सुरू होती. सातही संशयित आरोपींना घेऊन जाण्याची तयारी एनआयएने केल्याची माहिती आहे. मात्र, या वृत्ताला अधिकाऱ्यांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही. कन्हैयालालच्या हत्येपूर्वी उमेश कोल्हे यांची हत्या झाली होती. मात्र, खरी माहिती उशिरा समोर आली.

ही आहेत संशयित आरोपींची नावे

मुद्दसीर अहमद ऊर्फ सोनू रजा वल्द शेख इब्राहिम (२२, रा. बिसमिल्लानगर, अमरावती), शाहरूख पठाण बादशहा हिदायत खान (२५, रा. सुफियानगर), अब्दुल तौफिक ऊर्फ नानू शेख तसलीम (२४, रा. लालखडी), शोएब खान ऊर्फ भुऱ्या वल्द साबीर खान (२२, रा. यास्मीननगर) या चौघांना २३ जून रोजी अटक केली होती. खुनात अतिब रशीद वल्द आदिल रशीद (२२, रा. मौलाना आझादनगर) व डॉ. युसूफ खान बहाद्दूर खान (४४, रा. बिलाल कॉलनी, अमरावती) यांचा समावेश असल्याचे पोलिस उपायुक्त विक्रम साळी यांनी शनिवारी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT