Aditya Thackeray MLA shiv sena dare
Aditya Thackeray MLA shiv sena dareAditya Thackeray MLA shiv sena dare

आमदारांची डोळ्यात डोळे घालून पाहण्याची हिंमत झाली नाही - आदित्य ठाकरे

मुंबई : बंड केलेल्या आमदारांकडे मी बघितले. त्यांची डोळ्यात डोळे घालून पाहण्याची हिंमत झाली नाही. ते आपल्या मतदार संघात जातील तेव्हा शिवसैनिकांच्या डोळ्यात कसे बघतील, असा प्रश्न शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला.

बंड केलेल्या आमदारांची आज नैतिक परीक्षा झाली. ते सर्वजण खाली किंवा इकडे तिकडे बघत होते. ते माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहत नव्हते. मतदार संघात गेल्यावर शिवसैनिकांना ते काय सांगणार आहे. त्यांच्यासमोर कसे जाणार, असा प्रश्नही आदित्य ठाकरे यांनी केला.

Aditya Thackeray MLA shiv sena dare
भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर यांना जयपूरमध्ये अटक; तुरुंगात रवानगी

शिवसेनेचे (Shiv sena) व्हिप शिंदे गटाने मान्य केले नाही. आमच्याविरोधात त्यांनी मतदान केले. आज ते पोलिसांच्या संरक्षणात आले. आले नाही तर आणले गेले. हे किती दिवस चालणार आहे. फुटलेल्या आमदारांची नैतिक चाचणी झाली पाहिजे, असेही आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले.

बंडखोर आमदारांनी बंड पुकारल्यानंतर अगोदर सुरतमध्ये तळ ठोकले. यानंतर आसाममधील गुवाहाटीमध्ये काही दिवस राहिले. तब्बल ११ दिवसांनी बंड पुकारलेले आमदार शनिवारी (ता. २) रात्री मुंबईत दाखल झाले होते. यानंतर ते रविवारी विशेष अधिवेशनास सहभागी होण्यासाठी विधिमंडळात पोहोचले. त्यांनी शिवसेनेचा व्हिप नाकारून भाजपला मतदान केले.

तब्बल ११ दिवसांनी समोर आलेल्या बंडखोर आमदारांकडे आदित्य ठाकरे यांनी बघितले. मात्र, ते आदित्य ठाकरेकडे बघू शकले नाही. ते इकडे तिकडे किंवा खाली मान टाकून बघत होते, असे आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com