अड्याळ : बिळात अंड्यांवर वेटोळे घालून बसलेली नागीण.
अड्याळ : बिळात अंड्यांवर वेटोळे घालून बसलेली नागीण. 
विदर्भ

अड्याळ ः शेत नांगरताना आढळली सापाची अठरा अंडी

सकाळ वृत्तसेवा

अड्याळ (जि. भंडारा) : येथून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या उमरी येथील प्रदीप रोहणकर यांच्या शेतात नांगरणी सुरू असताना नागिणीसह अठरा अंडी आढळून आली. काही जण साप मारण्याच्या तयारीत होते. परंतु, शेतमालकांनी सर्पमित्रांना पाचारण केल्यामुळे नागिणीसह तिची अंडी सुरक्षित व सुखरूप आहेत.
रोहणकर यांच्या शेतात खरिपाच्या तयारीसाठी शेताची मशागत करण्याचे काम सुरू होते. जमिनीत अडसर ठरलेला लाकडाचा मोठा ओंडका बाजूला करण्यात आला; तेव्हा जहाल विषारी नागीण फणा काढून उभी होती. हे दृश्‍य पाहताच अनेकांची भीतीने गाळण उडाली. भला मोठा साप पाहून अनेक जण त्याला ठार मारण्यासाठी पुढे सरसावले. परंतु, सुज्ञ व्यक्तीने त्यांना थांबवून सर्पमित्रांना याबाबत माहिती दिली. सर्पमित्र संदीप शेंडे, आशिक नैतामे आपल्या चमूसह लगेच शेतावर दाखल झाले. सापाचा शोध घेण्यासाठी सर्पमित्रांनी आजूबाजूच्या जागेची तपासणी केली; तेव्हा एका खोल बिळात नागीण आपल्या अंड्यावर वेटोळे घालून बसल्याचे दिसून आले. सर्पमित्रांनी मोठ्या शिताफीने या सापाला पकडून दूर जंगलात सोडून दिले. अंडी सुरक्षितस्थळी ठेवण्यात आली. त्यातून पंधरा दिवसांनी पिल्ले बाहेर पडतील, अशी माहिती सर्पमित्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

IPL Revenue: IPLचे भविष्य संकटात! संघांच्या कमाईत झाली मोठी घसरण; काय आहे कारण?

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Bhima Koregaon Case: भीमा कोरेगाव प्रकरणात ट्विस्ट, दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक हनी बाबू यांनी मागे घेतला जामीन अर्ज

Bollywood News: व्हॅनिटी व्हॅन, स्टायलिस्ट अन् भरमसाठ फी! फिल्मस्टारवर एका दिवसाला किती पैसे होतात खर्च? वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT