File photo
File photo 
विदर्भ

एसीबीच्या एसपीवर विनयभंगाचा गुन्हा

सकाळवृत्तसेवा

नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पोलिस अधीक्षकाने एका महिला पोलिस कर्मचाऱ्याला शारीरिक सुखाची मागणी केली. या प्रकरणी चौकशीअंती सदर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. यामुळे संपूर्ण राज्यातील पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. एखाद्या पोलिस अधीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्याकडे नागपूर विभाग एसीबीचा पदभार आहे. एसीबी विभागातच पीडित महिला कार्यरत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी महिला शिपायाला कॅबिनमध्ये बोलावून तिचा मोबाईल क्रमांक पाटील यांनी घेतला. त्यानंतर वेळीअवेळी तिला फोन करणे सुरू केले. तसेच व्हॉट्‌सऍपवरून सुरुवातीला प्रेमाचे संदेश; नंतर अश्‍लील संदेश पाठवित असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पाटील यांनी तिला व्हॉट्‌सऍपवरून शारीरिक सुखाची मागणी केली. तिने प्रतिउत्तरात मॅसेज टाकून नकार दिला. तसेच यानंतर अशी मागणी न करण्याची समज दिली. त्यामुळे चिडून पाटील यांनी तिला कॅबिनमध्ये बोलावून आमिष दाखवून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार असह्य झाल्यामुळे महिलेने मुंबईतील पोलिस महासंचालक कार्यालयात (एसीबी) लेखी तक्रार केली. चौकशीअंती एसीबीच्या अधिकाऱ्यांना कलम 354 चा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार आज मंगळवारी सायंकाळच्या सुमारास सदर पोलिसांनी पाटील यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
चौकशी समिती केली गठित
महिलेने पोलिस महासंचालकां(एसीबी)कडे लेखी तक्रार दिली. तक्रारीवरून पाटील यांची चौकशी करण्यासाठी एक समिती गठित करण्यात आली. चौकशीत महिलेने वेगवेगळे पुरावे सादर केले. शारीरिक सुखाची मागणी केल्याचे चौकशीत समोर आले.

......
पोलिस विभागाची प्रतिमा मलिन
सिंचन घोटाळ्याचा तपास पाटील करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन तपासात पारदर्शकता ठेवली आहे. मात्र, त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे पोलिस विभागाची प्रतिमा मलिन झाली आहे.
.......

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT