After 31 years Moharam-Ganeshotsav together
After 31 years Moharam-Ganeshotsav together 
विदर्भ

३१ वर्षांनंतर मोहरम-गणेशोत्सव एकत्र 

सकाळ वृत्तसेवा

मागील ७० वर्षांत तिसऱ्यांदा सलग तीनदा मोहरम-गणेशोत्सव एकत्र 
कामठी - शहरात हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन व अन्य धर्मीय अशी जातनिहाय लोकसंख्या आहे. यात जातीधर्म, पंथ, पक्ष, विचारधारेचे लोक अनेक जातीधर्माचे लोक अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदाने नांदत आहेत. या शहरातील सामाजिक सलोखा दिशादर्शक आहे. हिंदू-मुस्लिम बांधव एकमेकांच्या सण उत्सवात सहभागी होतात. शहरात जातीय तणाव होत नाही. राज्यातही अनेक ठिकाणी मुस्लिमधर्मीय गणपती व हिंदूधर्मीय मोहरमचा सण साजरा करीत असतात. 

१९५० नंतर ७० वर्षांच्या कालावधीत गणेशोत्सव आणि मोहरमचा सण एकत्रितपणे सलग तीन वर्षे याप्रमाणे तब्बल तीन वेळा साजरे झाले आहेत. सन १९५६, १९५७, १९५८ त्यानंतर १९८५, १९८६, १९८७ आणि मागील वर्षांपासून म्हणजे २०१८, २०१९, २०२० अशा सलग तीन वर्षांत गणेशोत्सव-मोहरम एकत्रित साजरे होणार आहेत. यंदा गणेशोत्सव दरम्यान उद्या मंगळवार १० सप्टेंबरला मोहरम (ताजिया) साजरा होणार आहे. राज्यात २ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला मोठ्या थाटात प्रारंभ झाला आहे.

विघ्नहर्त्या गणेशाची मनोभावे पूजा करणारे असंख्य हिंदू धर्मीय भाविक असले तरी राज्यात काही ठिकाणी मुस्लिमधर्मीयसुद्धा गणेशोत्सव उत्साहात साजरा करीत असल्याची उदाहरणे पाहावयास मिळते. मुस्लिम धर्मीयांचा मोहरम राज्यात अनेक ठिकाणी गावागावात हिंदूधर्मीयसुद्धा मोठ्या मनोभावे साजरा करतात. एवढेच नव्हे तर राज्यात अनेक ठिकाणी गावगावात शहरात हिंदू धर्मीयसुद्धा मोहरम हा सण साजरा करीत असतात. यंदा हे दोन्ही धर्मीय सण राज्यात एकत्रित साजरे होणार आहे. दोन्ही धर्मीयांत उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळणार आहे.

हिंदू-मुस्लिम सणांचा अनोखा योग
तिथीनुसार निर्माण होत असलेल्या पंचांगात हा योगायोग तीनही वेळा सतत तीन वर्षे राहिला आहे. तिथीनुसार मोहरम व गणपती सण साधारणतः ३४ वर्षांनी एकत्र येतात. यापूर्वी ३१ वर्षाआधी हा योगायोग आला होता. आता पुन्हा तो योगायोग पुढे आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

Pune Fire News : पुण्यात PMPL बसला आग; परिसरात वाहतूक कोंडी

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT