sironcha. 
विदर्भ

अबब! या अभेद्य इमारतीचे वय 106 वर्षे?

तिरुपती चिट्याला

सिरोंचा (जि. गडचिरोली) : महाराष्ट्र राज्याच्या अगदी दक्षिण टोकावर असलेला सिरोंचा तालुका इंग्रज राजवटीत ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठी रेस्ट झोन होता. निसर्गरम्य असलेला हा परिसर ब्रिटिशांचा अतिशय आवडता असल्यानेच त्यांनी तेव्हा सिरोंचाला जिल्ह्याचा दर्जा दिला होता. सिरोंचा हे शहर प्राणहिता व गोदावरी या दोन नद्यांच्या काठावर वसले असल्याने येथील उंच डोंगरावरून दिसणारे निसर्गसौंदर्य मनाला भुरळ घालते.

इंग्रजांच्या काळात सिरोंचा, तेलंगणा, छत्तीसगडचा काही भाग इंग्रजांच्या सी. पी. ऍण्ड बेरार (मध्य प्रांत व वऱ्हाड) अधिनस्त येत होता. सिरोंचा मध्य भारतात असल्याने या परिसरात ब्रिटिश अधिकाऱ्यांची नेहमीच ये-जा असायची. त्यामुळे तेलंगणामार्गे येथून छत्तीसगडला जाताना विश्रामासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी येथे अनेक विश्रामगृहे बांधली. तसेच कार्यालयीन कामकाजासाठी विविध इमारतींची निर्मिती केली. यातील एका इमारतीत सध्या पंचायत समितीचे कार्यालय आहे. विशेष म्हणजे ब्रिटिशांच्या काळात या इमारतीत ब्रिटिशांचे कर वसुलीचे केंद्र होते. 1914 मध्ये बांधण्यात आलेली ही इमारत अद्याप मजबूत असून तिने 106 वर्षे पूर्ण केली आहेत.

अलीकडे सरकारी इमारतींचे आयुष्य जेमतेम पाच, दहा वर्षांचेच दिसून येते. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चून बांधण्यात आलेल्या या इमारतींमध्ये ना फार मजबूती असते ना टिकाऊपणा. पण, फारसे आधुनिक तंत्रज्ञान हाती नसतानाही ब्रिटिशांनी मन लावून बांधलेल्या अनेक इमारती देशभरात आहेत. त्यातील एक इमारत सिरोंचा तालुक्‍यात असून तब्बल 106 वर्षांची ही इमारत अद्याप अभेद्य आहे. या इमारतीतून पंचायत समितीचा कारभार चालविण्यात येतो.

वारसा जपण्याची गरज
इंग्रजांनी त्यांच्या राजवटीने अनेक निसर्गरम्य ठिकाणे निवडून सुंदर विश्रामगृहे बांधली. अनेक वैशिष्ट्यपूर्ण इमारतींची निर्मिती केली. पण, या इमारतींकडे नंतरच्या काळात विशेष लक्ष देण्यात आले नाही. ऐतिहासिक वारसा म्हणून या इमारती जपण्याऐवजी त्यातच सरकारी कार्यालये थाटून त्यांची दुरवस्था करण्यात आली. काही इमारती दुरुस्ती व देखभाली अभावी दुरवस्थेत आहेत. त्यामुळे हा ऐतिहासिक वारसा जपण्याची गरज आहे.

 संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: एकाच पदासाठी वेगवेगळ्या परीक्षा नको, शुल्कही वाचणार! मंत्री शेलार यांची विधानसभेत माहिती

Mobile App to Predict Cancer Risk: कर्करोगाचा अंदाज आता मोबाईलवर! टाटा रुग्णालयातील संशोधकांची निर्मिती; जोखमीचे मूल्यांकन शक्य

Pune University flyover: पुण्यातील विद्यापीठ चौकाच्या उड्डाणपुलावरुन जाताना उडतोय गोंधळ; अर्धवट कामामुळे अपघाताचा धोका

उन्हाचा तडाखा वाढला! दिवसभरात प्या ४ लिटर पाणी, जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष, नागरिकांनी लहान मुलांची, ज्येष्ठांची कशी घ्यावी काळजी? वाचा...

Akola News : टी-२० विजयाच्या जल्लोषानंतर अकोल्यात तणाव; दोन गटात वादः वाहनांची तोडफोड, दगडफेकीत नुकसान

SCROLL FOR NEXT