अमरावती : जिल्हाकचेरीत ठिय्या आंदोलन करताना फासेपारधी समाजाचे शिष्टमंडळ तसेच पालक व विद्यार्थी.
अमरावती : जिल्हाकचेरीत ठिय्या आंदोलन करताना फासेपारधी समाजाचे शिष्टमंडळ तसेच पालक व विद्यार्थी. 
विदर्भ

फासेपारधी का धडकले जिल्हाकचेरीवर... हे आहे कारण

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : समृद्धी महामार्गासाठी पाडण्यात आलेली प्रश्‍नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा पूर्ववत बांधून देण्यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. त्यासाठी फासेपारधी समुदायाच्या नागरिकांनी सोमवारी सकाळी 9.45 वाजता कार्यालय उघडताच अभ्यागतांच्या कक्षात ठिय्या दिला.

पाच सदस्यीय चमूशी झाली चर्चा

निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी आंदोलकांशी व त्यानंतर पाच सदस्यीय चमूने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याशी चर्चा केली. तद्‌नंतर लेखी आश्‍वासन द्यावे, या मागणीवर फासेपारधी नागरिक अडून बसल्याने चांदूररेल्वे उपविभागीय अधिकाऱ्यांनी दुपारी 4 वाजता त्यांना पत्र दिले. त्यानुसार शाळेच्या जागेचा प्रस्ताव विभागीय आयुुक्तांमार्फत शासनास सादर झालेला आहे. शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर शाळेला संरक्षणभिंत बांधून देण्याची कार्यवाही नियमानुसार केली जाईल.

मृताच्या कुटुंबीयांना मिळणार मदत

महामार्गाची धूळ उडू नये, यासाठी कंत्राटदाराला आवश्‍यक सूचना दिल्या जातील. शाळेचा पिलर कोसळून मृत्युमुखी पडलेल्या मुलीच्या पालकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदतीचा प्रस्ताव शासनास सादर केला जाईल, शाळेच्या आवारातील बुजविलेल्या विहिरींची पाहणी करण्यात येईल. तहसीलदारांमार्फत खोलीकरणाचा प्रस्ताव सादर केला जाईल. धुळीमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्‍यात येऊ नये, यासाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची चमू विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी पाठविली जाईल, असे पत्र उपविभागीय अधिकारी श्री. गायकवाड यांनी दिले.

लेखी आश्‍वासन मिळाल्यानंतर फासेपारधी नागरिकांनी विद्यार्थ्यांसाठी पाण्याची तातडीने व्यवस्था करून देण्याची मागणी रेटून धरली. त्यावर आंदोलकांची समजूत काढून दुपारी 4.30 च्या सुमारास आंदोलनाची सांगता झाली.

60 लाखांच्या दोन विहिरी

विद्यार्थ्यांना पाण्याची सोय व्हावी, यासाठी दोन विहिरींवर अनुक्रमे 35 व 25, असा एकूण 60 लाखांचा खर्च आदिवासी फासेपारधी सुधार समितीने लोकवर्गणीतून केला, असा चक्रावून सोडणारा दावा आंदोलकांनी निवेदनात केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Constitution : '...तर मोदी सरकारने केव्हाच देशाचे संविधान बदलले असते'

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

SCROLL FOR NEXT