विदर्भ

ही राजनगरी नव्हे समस्यांचीच नगरी! अहेरीवासीयांना रोजचाच मनस्ताप

सकाळ वृत्तसेवा

अहेरी (जि. गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागातील महत्त्वाचा तालुका म्हणजे अहेरी. अहेरीला विदर्भात राजनगरी म्हणून ओळखले जाते. गडचिरोली जिल्ह्याचे सत्ताकेंद्र अहेरीच आहे. परंतु, हीच राजनगरी वर्षानुवर्षांपासून विकासापासून कोसोदूर आहे. नावाला या शहराला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला; मात्र समस्या अद्यापही ‘जैसे थे’ आहेत. नगरपंचायत झाली, आता आपल्या समस्या सुटतील. मूलभूत सुविधांसह आता आपल्याला कशाचीच ददात राहणार नाही, हा जनतेचा समज अल्पावधीत खोटा ठरला. आजही नागरिकांना साध्या साध्या सुविधा मिळत नाहीत. (Aheri-taluka-Rajnagari-in-Vidarbha-Far-from-development-Lack-of-facilities-nad86)

नगरपंचायत तर झाली; परंतु सुविधा पुरविणार कोण? नगरपंचायतीत समाविष्ट गडअहेरी, बामणी, चेरपल्ली हा ग्रामीण भाग उपेक्षित आहे. बऱ्याच ठिकाणी नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. ऐन पावसाळ्याच्या दिवसांत नाल्या आणि रस्त्यांची कामे सुरू असल्याने स्थानिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. मुख्य रस्त्यावर अतिक्रमण असल्याने रस्ते अरुंद झालेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. यापासून नागरिकांची सुटका करायची असेल तर स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. तेव्हाच राजनगरीचा उद्धार होईल.

राजनगरीच्या मुख्य चौकातच रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झालेली दिसली. बाजारपेठेत बऱ्यापैकी गर्दी असली तरी वाहतुकीचे तिनतेरा वाजलेले होते. एकापाठोपाठ एक भराभर जाणारे तेलंगणा राज्यातील पिवळ्या रंगाचे आॅटोरिक्षे लक्ष वेधून घेत होते. त्यामुळे शेजारील राज्यातील मोठी वर्दळ अहेरीत असते, हे लक्षात आले. अहेरीलगतच्या प्राणहिता नदीवर मोठे पूल झाल्याने तेलंगणा राज्यातील लोक अहेरीच्या बाजारपेठेत रस्त्यावर चालताना दिसत होते. परंतु रस्ते बकाल होते. गेल्या कित्येक वर्षांपासून रस्त्याचे काम रखडल्याची तक्रार स्थानिकांनी केली. या रस्त्यांवरून जाताना पायी, सायकल, दुचाकी व चारचाकी वाहनांची ये-जा करायला त्रास होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी

मुख्य बाजारपेठेसह इतरही मार्गांवर अतिक्रमणाची मोठी समस्या आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अतिक्रमण वाढत असल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. लोकसंख्या वाढली, सायकल, दुचाकी, चारचाकी गाड्या चालविणारे लोकही वाढलेत. परंतु त्या तुलनेत रस्त्यांचा काही विकास झालेला नाही. ग्रामीण भाग तसेच तेलंगणातून लोक बाजारपेठेत येत असल्याने रहदारी वाढली. वाहतूक कोंडीमुळे स्थानिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. आठवडी बाजाराच्या दिवशी परिस्थिती हाताबाहेर जाते.

लाखो, कोट्यवधी रुपये खर्च करून नगरपंचायत प्रशासनाने शहरात हायमास्ट लाईट लावले. परंतु आज ते केवळ शोभेची वस्तू बनले आहेत. शहरातील मुख्य चौकात (राजे विश्वेश्वरराव महाराज चौक) लावलेले हायमास्ट लाईट गेल्या पाच-सहा महिन्यांपासून बंद आहेत. परंतु नगरपंचायत प्रशासनाला त्याच्याशी काही देणे-घेणे नाही. शहरातील दिवाबत्तीची सोय करण्याची जबाबदारी नगरपंचायतीची असताना लाईट खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याचे सांगितले जाते. शहरातील बहुतेक ठिकाणी लाईट बंद आहेत. त्यामुळे ही राजनगरी की अंधेरनगरी हाच प्रश्न पडतो.
- सुरेंद्र अलोणे, सामाजिक कार्यकर्ते, अहेरी
नगरपंचायतीच्या वतीने शहरात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ८० च्या वर घरकुल मंजूर करण्यात आले. परंतु याचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना न मिळता ज्यांच्याकडे पक्की घरे आहेत त्यांना मिळाला. याबाबत संबंधितांना निवेदन देऊन तक्रार करण्यात आली; परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. ज्यांना घरकूल मंजूर झाले त्यांनी घरावरील कवेलू काढून स्लॅब टाकले. तर काहींनी जुन्याच घरांची डागडुजी केली. जे झोपडीत होते ते आजही झोपडीतच आहेत. याची कुठेतरी चौकशी होणे आवश्यक आहे. गरिबांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा.
- रवी अण्णा नेलकुंद्री, भाजप तालुकाध्यक्ष अहेरी

(Aheri-taluka-Rajnagari-in-Vidarbha-Far-from-development-Lack-of-facilities-nad86)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT