akola coronavirus exposed, biometric presence of
akola coronavirus exposed, biometric presence of 
विदर्भ

coronavirus:बायोमॅट्रिक हजेरी बंद

सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना विषाणू संर्गास प्रतिबंधात्मक व खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बायोमेट्रीक हजेरीला मर्यादीत कालवधीसाठी स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत अधिकारी, कर्मचाऱ्यांना हजेरीपटावर उपस्थिती दर्शवावी लागणार आहे.

कोरोना विषाणू फैलावास प्रतिबंध करण्यासाठी बहुसंख्येने लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सार्वजनिक जत्रा, यात्रा, तसेच अन्य धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा विषयक सर्व कार्यक्रम पुढील सूचना येईपर्यंत रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. कोरोनो विषाणूचा प्रसार शासकीय कार्यालयांमध्ये होउ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कार्यालयांमधील बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीचा वापर पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आला आहे. या कालावधीमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांची हजेरी पूर्वीप्रमाणे हजेरीपटावर नोंदविण्यात येणार आहे. यासंदर्भात विभाग, कार्यालयांनी संबधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे मार्च महिनाभर तरी अधिकारी, कर्मचारी हजेरीपटावर स्वाक्षऱ्या करताना दिसून येतील. यासंबंधीचा शासन निर्णयच शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केला आहे.

मनपातही अंगठा दाखवून हजेरी बंद
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून खबरदारीच्या उपाययोजनांतर्गत कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अकोला महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचीही आता अंगठा दाखवून हजेरी बंद करण्यात आली असून, परंपरांगत पद्धतीनेचे कर्मचारी स्वाक्षरी करून कार्यालयात हजेरी लावणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT