Court order esakal
विदर्भ

Crime : बहुचर्चित 'त्या' खून प्रकरणातून १४ जण निर्दोष; सरकारी पक्षाला गुन्हाच सिद्ध करता आला नाही

सकाळ वृत्तसेवा

अकोलाः शहरातील शास्रीनगरमध्ये घडलेल्या खून प्रकरणातून १४ जाणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. संशयाचा लाभ देत न्यायालयाने हा निर्वाळा दिला आहे.

सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनच्या हद्दीत शास्त्रीनगर येथे २५ मार्च २००८ रोजी मनोज धुळे मृतावस्थेत आढळून आले होते. या घटनेत पोलिसांनी मृतकाच्या बहिणीच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

तपासात पोलिसांनी मनोज धुळेच्या खुनाच्या आरोपात फिरोज खान अब्दुल्ला खान, अब्दुला खान अमीर खान, अफरोज खान अब्दुल्ला खान, शेख काजीम उर्फ पहलवान शेख अब्दुल्ला, अज्ञया उर्फ अकबर शेख सलीम, शेख पप्पू शेख कुरबान, जफर खान उर्फ (जफर सुपारी) जमीर खान, नजीमोद्दीन उर्फ बाबा सिकंदर सलामोद्दीन, शेख शब्बीर शेख बिस्मिल्ला, अजहर खान उर्फ अज्जू अय्याज खान, शेख गफूर शेख हुसेन, छोटू खंडू उगवे, जहीर खान अलीयार खान, इमरान खान किफायत खान यांच्या विरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.(Latest Marathi News)

त्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी द्वितीय जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. बी. पतंगे यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे १२ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीवरुद्धचा गुन्हा सरकारी पक्षाला सिद्ध करता आला नाही. (Marathi Tajya Batmya)

मनोज धुळेचा मृतदेह सापडला असला तरी त्याचा खून कोणी केला व कोणत्या कारणास्तव झाला हे सरकारी पक्ष सिद्ध करू शकले नाही. त्यामुळे न्यायालयाने संशयाचा लाभ देत सर्व आरोपीला निर्दोष मुक्त करण्याचा निर्वाळा दिला. या प्रकरणात आरोपीची बाजू ॲड. एम. बी. शर्मा, मोहन मोयल, मुन्ना खान यांनी मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill on IND vs SL Draw: "२५० षटकं अन् सलग तीन दिवस फिल्डिंग..." फॉलोऑननंतरही सामना ड्रॉ राहिल्याबद्दल गिल काय म्हणाला?

Marathi News Live Updates : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय आयुक्तांसह मराठ्यातील जिल्हाअधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक

Manora News : कृषी केंद्राचा परवाना रद्द न करण्यासाठी २५ हजारांची लाच; मंडळ कृषी अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Hotel Business : हॉटेल व्यवसायाला ग्राहकांच्या अविश्वासाचा फटका! एफडीए कारवाईनंतर शहरातील रेस्टॉरंटमध्ये २० टक्क्यांपर्यंत घट

Pune News : स्थायी समितीतील निर्णय फिरवला! टक्केवारीच्या ‘दुर्गंधी’ने स्वच्छ सेवक साहित्याविना

SCROLL FOR NEXT