मूर्तिजापूर नगर परिषद sakal
विदर्भ

अकोला : पीएम अवार्डसाठी मूर्तिजापूर नगर परिषदेची निवड

राज्यातील एकमेव नगर परिषद पीएम स्वनिधी योजने अंतर्गत पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा

मूर्तिजापूर: केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेत अतिउत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर नगर परिषदेची निवड करण्यात आली आहे. राज्यातून या पुरस्कारासाठी निवड झालेली मूर्तिजापूर ही एकमेव नगर परिषद आहे.

केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी- पीएम स्वनिधी पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पथपुरवठा सुविधा योजनेची राज्यात अमंलबजावणी करण्यात आली होती. त्याअंतर्गत कोविड-१९ च्या कालावधीमध्ये मूर्तिजापूर नगर परिषदेमध्ये या योजनेची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी केली. त्यामध्ये डिसेंबर २०२१ पर्यंत प्रथम कर्ज १० हजार हे ३०२ पथविक्रेत्यांना व सदर प्रथम कर्जाची परतफेड केलेल्या पात्र ३६ लाभार्थीना दुसरा टप्पा कर्ज २० हजार रुपये असे एकूण ३३८ पथविक्रेत्यांना राष्ट्रीयकृत बँकांकडून व्याजावरील अनुदानास पात्र असे कर्ज वितरीत करण्यात आले होते. त्यांना ‘मैं भी डिजिटल’ या मोहिमअंतर्गत विविध बँका व वित्तीय संस्थांकडून क्यूआर कोड देऊन डिजिटल व्यवहार करण्यास प्रशिक्षण देऊन त्यामध्ये त्यांना कॅशबक प्राप्त करून घेण्यासाठी प्रशिक्षण देऊन प्रोत्साहित करण्यात आले होते.

प्रशासनिक सुधार आणि लोकतक्रार विभाग यांचेकडून केंद्र शासनाच्या विविध योजने अंतर्गत भारतातील व महाराष्ट्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या सर्व महानगरपालिका / नगरपरिषदा/ नगर पंचायती यांना पीएम अवार्ड करिता आवेदनपत्र ऑनलाईन करण्या करिता सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी - पीएम स्वनिधी या योजने अंतर्गत मूर्तिजापूर नगर परिषदेने सादर केलेल्या उदिष्ट पुर्तता व उल्लेखनिय कामाच्या आधारावर केंद्र शासनाने भारतातील एकूण ११ महानगरपालिका व आठ नगर"परिषदा यांची प्राथमिक निवड केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातून एकमेव मूर्तिजापूर नगर परिषदेची पीएम स्वनिधी पीएम अवार्डकरिता प्राथमिक निवड करण्यात आली आहे. ही बाब संपूर्ण राज्य व अकोला जिल्ह्याकरिता अभिमानास्पद असून, राज्यस्तरावरून व विविध विभागाकडून मूर्तिजापूर नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विजय लोहकरे यांचे अभिनंदन व स्तुती करण्यात येत आहे. या योजने अंतर्गत योजनेचे विभाग प्रमुख सहाय्यक प्रकल्प अधिकारी राजेश भुगूल यांचे सुध्दा सर्वस्तरा वरून उल्लेखनिय काम केल्या बददल अभिनंदन करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT