Akola sakal
विदर्भ

Akola : आज ठरणार पंचायत समितीचे कारभारी

मोर्चेबांधणी; पडद्यामागील घडामोळींना वेग

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या सात पंचायत समितींच्या सभापती पदाची आरक्षण सोडत काढण्यात आल्यानंतर रविवारी अकोला व तेल्हारा पंचायत समिती वगळता इतर पाच पंचायत समितीमध्ये सभापती पदासाठी निवडणूक होणार आहे, तर अकोला व तेल्हारा पंचायत समितीमध्ये सभापतींचे पद आरक्षणानुसार निश्चित झाल्याने या पंचायत समितींमध्ये केवळ उपसभापती पदासाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान सदर निवडणुकीमुळे राजकीय घडामोळींना वेग आला असून इच्छुकांकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या सात पंचायत समितीच्या सभापदी व उपसभापतींचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपत असल्याने सभापती पदासाठी गुरुवारी (ता. १३) जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी सर्वात आधी पंचायत समिती सभापतीपदी ज्या प्रवर्गाचे आरक्षण होते ते वगळण्यात आले. त्यामुळे अकोट व पातूर पंचायत समिती वगळता इतर पंचायत समितींचे आरक्षण निश्चित झाले. त्यानंतर अकोट व पातूर तालुक्यात नामाप्र प्रवर्गाचे आरक्षण निश्‍चित करण्यासाठी सोडत काढण्यात आली.

सोडतीत पातूर पंचायत समितीचे सभापती पद नामाप्र महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले, तर अकोट पंचायत समितीमधील सभापतीचे पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले. सदर प्रक्रियेनंतर पंचायत समिती सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक होत असल्याने राजकीय घडामोळींना वेग आला आहे.

इच्छुकांची फिल्डिंग

अकोला पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव झाले असून भाजपकडून निवडून आलेल्या सुलभा सोळंके या एकमात्र अनुसूचित जमातीच्या महिला सदस्या आहेत. त्यामुळे त्यांंना आरक्षणामुळे सभापती पदाची लॉटरी लागली. त्यासोबतच तेल्हारा पंचायत समितीमध्ये अनुसूचित जातीच्या (महिला) आरक्षित जागेवरुन निवडून आल्याने एकमात्र सदस्य आम्रपाली गवारगुरू यांची सुद्धा निवड निश्चित झाली आहे. त्यामुळे या पंचायत समितीमध्ये उपसभापती पदासाठीच रस्सीखेच होणार आहे. तर इतर पंचायत समितीमध्ये सभापती व उपसभापती पदासाठी सामना रंगणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT