death Sakal
विदर्भ

Chandrapur News : दारू सोडण्याचे औषध बेतले जिवावर; दोन तरुणांचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

सकाळ वृत्तसेवा

भद्रावती (जि. चंद्रपूर), ता. २२ ः दारू सोडण्यासाठी एका भोंदू वैद्याने दिलेल्या औषधांमुळे दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील गुळगाव येथे घडली. हेच औषध घेतलेल्या आणखी दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यात एका मृताच्या वडिलांचा समावेश आहे.

भद्रावती तालुक्यातील गुळगाव येथील सहयोग सदाशिव जीवतोडे (वय १९) आणि प्रतीक घनशाम दडमल (वय २६) अशी मृतांची नावे आहेत. सदाशिव पुंजाराम जीवतोडे (वय ४५) आणि सोमेश्वर उद्धव वाकडे (वय ३५) यांच्यावर भद्रावती येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदाशिव हे सहयोगचे वडील आहेत. या चारही जणांना दारुचे व्यसन होते.

नजीकच्या व्यक्तींच्या सल्ल्यावरून त्यांनी दारू सोडण्याचे औषध घेण्याचे ठरविले. मंगळवारी (ता. २१) ते वर्धा जिल्ह्यातील शेडेगाव येथे शेळके महाराज यांच्याकडे गेले. शेळके महाराज औषध देऊन दारू सोडवितो, असा दावा करतात. या चारही जणांनी शेळके महाराजांनी दिलेले औषध तिथेच प्राशन केले आणि गावच्या दिशेने निघाले. वाटेत त्यांना अस्वस्थ वाटायला लागले.

मात्र, हा औषधांचा परिणाम आहे, असे समजून त्यांनी दुर्लक्ष केले. घरी आल्यानंतर रात्री या चारही जणांची प्रकृती खालावली. रात्रीच २५ किलोमीटरवरील भद्रावती येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेव्हा सहयोग आणि प्रतीक यांचा मृत्यू झाल्याचे डॅाक्टरांना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

Marathi News Live Updates : वर्ध्यात भटक्या कुत्र्याचा हैदोस, दिवसभरात तब्बल १९ जणांना चावा

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

SCROLL FOR NEXT