विदर्भ

विमानतळावर अलर्ट

सकाळ वृत्तसेवा
नागपूर : देशातील विमानतळ सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावरही सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
नागपूर विमानतळाच्या सुरक्षेत तैनात असलेल्या सीआयएसएफच्या जवानांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. सामानाची नियमित तपासणी करण्यात येत आहे. त्या सोबतच संशय आल्यास बॅगची कसून तपासणीसुद्धा करण्यात येत आहे. शंका आल्यास वाहनांच्या तपासणीच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. व्हिजिटर गॅलरीसाठीच्या एंट्री पास बंद करण्यात आल्या आहेत. याशिवाय परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे. विमानतळ कर्मचाऱ्यांचीसुद्धा तपासणीही बारकाईने केली जात आहे. मुंबई, दिल्ली, नागपूरसह देशातील 19 विमानतळांवर अलर्ट असल्याची माहिती सूत्राने दिली. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर दरवर्षीच सुमारे 10 ऑगस्टपासून विमानतळांवरील पाळत वाढविली जाते. यंदा मात्र जम्मू-कश्‍मीरातील 370 कलम रद्द केल्याने दोन दिवस पूर्वीपासूनच सुरक्षाव्यवस्था चोख करण्यात आली आहे. 10 ऑगस्टपासून तपासणीची प्रक्रिया अधिकच कडक करण्यात येणार आहे. त्यासाठी विमानतळावर 3 तास पूर्वीच पोचण्याच्या सूचना प्रवाशांना देण्यात आल्या आहेत. याशिवाय प्रवाशांना निरोप देण्यासाठी येणाऱ्यांनासुद्धा आतमध्ये प्रवेश नाकारला जाणार आहे.
संपूर्ण उपराजधानीत सतर्कता
गुप्तचर यंत्रणेने देशातील 5 राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला असून त्यात महाराष्ट्रातील मुंबई व नागपूर या शहरांचाही समावेश आहे. आरएसएसचे मुख्यालय आसल्याने नागपूर पूर्वीपासूनच संवेदनशील मानले जाते. संघ मुख्यालयाच्या सुरक्षेत असणाऱ्या यंत्रणेसह पोलिस दलानेही शहरातील हालचालींवर लक्ष केंद्रित केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

SCROLL FOR NEXT