file photo
file photo 
विदर्भ

अमरनगर ते बर्डी बससुविधेचे लोकार्पण

सकाळ वृत्तसेवा

हिंगणा एमआयडीसी  (जि.नागपूर):   अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आपली बसचा प्रश्‍न अखेर मार्गी लागला. "सकाळ'मधून या संदर्भात वृत्त प्रकाशित होताच यंत्रणा खळबडून जागी झाली. सोमवारी बसचे उद्घघाटन झाले. बस सुरू झाल्याने गावक-यांनी "सकाळ' चे आभार मानले.
 आमदार समीर मेघे यांनी बसला हिरवी झेंडी देउन शुभारंभ केला. या बससुविधेचा लाभ या क्षेत्रातील एकूण जवळपास पन्नास हजार लोकसंख्या असलेल्या अमरनगर, निलडोह, वानाडोंगरी प्रभाग क्रमांक एक, डिगडोह देवी येथील प्रवाशांना होणार आहे. आमदार मेघे व आपली बसचे संचालक यांच्याशी निवेदने देवून संपर्क साधला. भाजयुमोचे महामंत्री कमलेश खोब्रागडे यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी आमदार समीर मेघे व परिवहन विभागाकडे पत्रव्यवहार करून त्यांच्या अथक प्रयत्नाने ही बससुविधा सुरू करून घेतली. ही बससुविधा एसआरपीएफ, अमरनगर ते बर्डीपर्यंत राहणार आहे. जीएसपीएस, अमरनगर, राममंदिर अमरनगर, त्रिमूर्ती बुद्धविहार अमरनगर, टीपॉईंट अमरनगर, जि.प.स्कूल निलडोह, जुना निलडोह, पिक्‍स ट्रान्समिशन, डिगडोह देवी, महिंद्रा कंपनीमार्गे बर्डीला जाणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वानाडोंगरी नगरपरिषदेच्या अध्यक्ष वर्षाताई शहाकार, बांधकाम सभापती नितीन साखळे, नगरसेवक आनंद भडांगे, शिक्षण सभापती ललिता राऊत, महिला व बालकल्याण सभापती प्रमिला यादव, माजी सरपंच सतीश शहाकार, वानाडोंगरी नगर परिषदे गटनेते शुभम गोहाड, निलडोड ग्रामपंचायतच्या सरपंच वनिता गरमळे, उपसरपंच मनोज सुभेकर, ग्रामपंचायत सदस्य सुभाष खडेकर ,उर्मिला गायधने, पंचशीला मंडपे, प्रविश भाबडा, शुभम दाभे, राजेंद्र हरडे ,महेश लोखंडे, सौरभ झा, हरिचंद्र अवचट, विशाल भोसले, आदर्श पटले, मंगेश हरणे, ओमप्रकाश वैद्य, भगवान बालपांडे, विपिन विश्वकर्मा, विवेकानंद राम, मंगल शर्मा, जयसिंग पटले, राकेश दुबे, योगेश बिसेन, नितेश कुबळे, राधेश्‍याम पुष्पतोडे, संजय जिभेंकर, रमेश मंडपे आणि अन्य नागरिक उपस्थित होते.
शहरसिमा वाढली. शहर वाढले, विकास होत आहे. पण आजही निलडोह, डिगडोह या दोन्ही गावात बस येत नसल्याने नागरिक व विद्यार्थ्यांना दोन किलोमिटरची पायपिठ करावी लागायची. आम्ही मागणी करीत होतो, पण प्रशासन दखल घेत नव्हते. पण "सकाळ' ने आमचा आवाज प्रशासनापर्यंत पोहचविला.
बाबूराव येरणे
कार्याध्यक्ष,
टॉईज कंपनी सुरु असताना निलडोह डिगडोह गावांना या बसचा फायदा व्हायचा. पण टाईज कंपनी कपंनी बंद झाल्याने बस बंद झाली. पण आता सुरू झाली याचा आंनद आहे. "सकाळ' चे आभार.
अशोक घुगरे
माजी सरपंच
निलडोह ग्रा.पं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

Latest Marathi News Update : झारखंडमध्ये ईडीचे छापे, मंत्र्याच्या कर्मचाऱ्याकडून करोडोंची रोकड जप्त

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT