Ambulance-Accident
Ambulance-Accident 
विदर्भ

रुग्णवाहिका उलटून रुग्ण ठार; चौघे जखमी

सकाळवृत्तसेवा

सिहोरा (जि. भंडारा) - तुमसर-बपेरा राज्यमार्गावर गेल्या ४८ तासांत तीन अपघात घडले. रुग्णवाहिका उलटून झालेल्या अपघात रुग्णाचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत पुलाला धडक देणाऱ्या काळीपिवळीचा चालक थोडक्‍यात बचावला. तसेच भरधाव एसटी बसने शेळ्यांना चिरडले. 

मध्य प्रदेशातील रामपायली येथून आज पहाटे चारच्या सुमारास रुग्णवाहिका तुमसर-बपेरा मार्गाने नागपूरकडे जात असताना मोहगाव (खदान) नजीक चालकाचे नियंत्रण सुटल्याने रुग्णवाहिका उलटून अपघात झाला. यात संजय बन्सवाल (वय ४०, रा. रामपायली) या रुग्णाचा मृत्यू झाला, तर चारजण जखमी झाले. गावकऱ्यांच्या मदतीने जखमींना उपजिल्हा रुग्णालयात  हलविण्यात आले. दुसऱ्या घटनेत तुमसर-बपेरा राज्यमार्गावरील बावनथडी नदीच्या पुलावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने काळीपिवळी पुलाच्या कठड्याला धडकली. सुदैवाने गाडी खाली न कोसळल्याने चालकाचे प्राण वाचले. तिसऱ्या घटनेत मच्छेरानजीक परिवहन महामंडळाच्या बसने बुधराम व अमृत पटले यांच्या मालकीच्या तीन शेळ्या चिरडल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT