Amit shah Slam INDIA Alliance in Akola Akola Lok Sabha Election campaign BJP Anup Dhotre vs Congress Abhay Patil
Amit shah Slam INDIA Alliance in Akola Akola Lok Sabha Election campaign BJP Anup Dhotre vs Congress Abhay Patil  
विदर्भ

Akola Lok Sabha Election : अनुप धोत्रेंच्या प्रचारासाठी अमित शाह मैदानात! अकोल्यात इंडिया आघाडीवर साधला निशाणा

रोहित कणसे

Akola Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापताना पाहायला मिळत आहे. यादरम्यान राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघात प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. आज विदर्भातील अकोला येथे महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा पार पडली. यावेळी अमित शाह यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.

सभेला संबोधित करताना अमित शाह म्हणाले की, ही भूमी गजानन महाराज, संत गाडगेबाबांची भूमी आहे. आज हनुमान जयंती आहे आणि आत्ताच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी अयोध्येत रामलल्लांचं भव्य मंदिर बनवलं आहे. हे इंडिया आघाडीवाले म्हणतात की राम मंदिर बनलं नव्हतं पाहिजे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून ७० वर्षांपर्यंत राम मंदिराचा मुद्दा अडकवून ठेवण्यात आला. तुम्ही मोदींना दुसऱ्यांदा पंतप्रधान बनवलं, त्यांनी पाच वर्षात भूमिपूजनही केलं, कोर्टात केसही जिंकली आणि प्राणप्रतिष्ठा देखील केली, असेही अमित शाह म्हणाले.

पाचशे वर्षानंतर या रामनवमीला भव्य मंदिरात रामलल्लांच्या कपाळावर सूर्याचा तिलक होताना आपण पाहिला. हा दिवस आपले नेता आणि देशाचे पंतप्रधान मोदी यांच्यामुळे पाहायला मिळाला असेही शाह यांनी नमूद केले.

काँग्रेसवाले आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला ११ व्या क्रमांकावर सोडून गेले होते, नरेंद्र मोदी पाचव्या क्रमांकावर घेऊन आले. अकोलावासीयानो तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी बसवा पाचव्या क्रमांकावरून थेट तिसऱ्या क्रमांकावर घेऊन येण्याचं काम मोदी करतील असेही अमित शाह यावेळी म्हणाले.

तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनल्यानंतर युवा, महिला, शेतकरी, मागासवर्ग, दलित आणि आदिवासी यांना फायदा होईल. तीन कोटी लखपती दीदी तयार करायच्या आहेत, असेही अमित शाह म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मतदानात महाराष्ट्र तळाला, आतापर्यंत झालेल्या मतदानात 'हा' मतदारसंघ आघाडीवर

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT